file Photo
file Photo 
नांदेड

कोरोनाला हलक्यात घेऊ नका; नांदेडला दिवसभरात संख्या दुपटीने वाढली 

शिवचरण वावळे

नांदेड - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसापूर्वीच मराठवाड्यातील कोरोना आजाराबद्दलचा आढावा घेत जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक या सर्वांनी मिळुन योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दुपट्टीने वाढल्याचे दिसून आले आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे बुधवारी (ता. १७) स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी (ता.१८) ६१९ अहवाल प्राप्त झाले. यामधील ५५८ निगेटिव्ह तर ५८ पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ९८८ वर पोहचली आहे. 

५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

गुरुवारी महापालिका क्षेत्रात ३७, नांदेड ग्रामीण - दोन, भोकर - दोन, हिमायतनगर - एक, किनवट - पाच, बिलोली- एक, हदगाव - एक, मुदखेड- दोन, कंधार - एक, देगलूर - एक, पुणे- एक, हिंगोली -दोन, परभणी - एक व यवतमाळ एक असे ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या भोकर येथील एका ७५ वर्षाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरात कोरोना आजाराने आतापर्यंत ५९१ जणांचे मृत्यू झाला आहे. 

२८१ बाधितावर उपचार सुरु

गुरुवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील - एक, महापालिकेंतर्गत गृहविलगीकरण कक्षात - २३, भोकर - एक, किनवट - एक, बिलोली - एक, हैदराबाद - एक व खासगी रुग्णालयातील सात असे ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. जिल्हाभरात सध्या २८१ बाधितावर उपचार सुरु असुन, त्यापैकी ११ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ स्वॅबची चाचणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः

एकुण पॉझिटिव्ह - २२ हजार ९८८ 
एकुण बरे - २१ हजार ९०५ 
एकुण मृत्यू - ५९१ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - ५८ 
गुरुवारी बरे - ३५ 
गुरुवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - २९५ 
गंभीर रुग्ण - ११ 
प्रलंबित स्वॅब - ३९५ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT