NND12KJP01.jpg 
नांदेड

‘डीएसएओं’नी निंबोळ्या वेचल्या अन् ट्रॅक्टरही चालविले......कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कंधार तालुका कृषी कार्यालयाच्याकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना शुक्रवारी (ता. १२) भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांची पाहणी शेतकऱ्यांसमवेत निंबोळ्या वेचल्या. तसेच ट्रॅक्टर चालवून पेरणीचे प्रात्याक्षीकही केले. जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकारी शेतावर येवून शेतकऱ्यांत मिसळल्याने समाधान कष्टकऱ्यांनी व्यक्त केले. 

लिंबोळीचे सांगितले निंबोळीचे फायदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी मानसपुरी येथे लिंबोळीचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबोळ्या गोळा करून निमार्क तयार करून वापर करावा असे आवाहन केले.
विविध योजनेतंर्गत मानसपुरी संगमवाडी येथे पाणलोट क्षेत्र विकासाच्या ढाळीचे बांध, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर कामांना भेटी दिल्या व पाहणी केली.

विविध योजनांची केली पाहणी
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गंगणबीड येथील सामुहीक शेततळे, त्यावर लागवड केलेली पपई, ठिबक सिंचनावर कापूस लागवड पाहणी केली. ठिबक सिंचन संच पाहणी केली. गंगणबीड, नागलगाव येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड केलेल्या पेरू, आंबा या फळपिकांची पाहणी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तळ्याचीवाडी नागलगाव येथील कांदाचाळींची पाहणी केली. 

ट्रॅक्टर चालवून केली पेरणी
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत नागलगाव येथे वितरीत केलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राची पाहणी केली. बियाणेला बिज प्रक्रिया करून मार्गदर्शन केले.
स्वत: ट्रॅक्टर चालवत ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राने पेरणी करून खरीपातील पेरणीचा शुभारंभ केला. तालुक्याच वैभव लालकंधारी वळू या पशुधनाची पाहणी केली. 

उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला सत्कार
तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी पवणसिंह बैनाडे, कृषी पर्यवेक्षक रोहीणी पवार, कृषी सहाय्यक श्री. गुट्टे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी विभागात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. कृषी सेविकाश्रीमती रोहीणी पवार यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तर कृषी सेविका श्रीमती पिंपळगावे, लिपीक सय्यद ईब्राहीम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT