Hospital esakal
नांदेड

Nanded News :साथीच्या रोगाच्या काळात रुग्णांची होतेय हेळसांड

कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त ग्रामीण रुग्णालय चालू करण्याची मागणी

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त असल्यामुळे सद्या कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह प्रभारी डॉक्टर यांच्यावर कुंडलवाडी शहर व परिसरातील रुग्णांचा मोठा भार पडत आहे. त्याचा परिणाम रुग्णांवर होत आहे, अशा गंभीर बाबीकडे जिल्हा आरोग्य विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून रिक्त पदे तत्काळ भरून रुग्णांची होत असलेली हेळसांड दुर करण्याची आवश्यकता आहे.

कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत पाच उपकेंद्रासह परिसरातील २४ गावांचा समावेश होतो, या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणात शहर व परिसरातील रुग्ण येत असतात. येन पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे रुग्णांना अतिसार, उलट्या, मलेरिया, डेंगू या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

हा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने अद्याप तरी कुठलेही जनजागृती किंवा उपाययोजना केलेली दिसून येत नाही, असे असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक पदे रिक्त आहेत त्यामध्ये कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायम वैद्यकीय अधिकारी एक, औषध निर्माता एक, स्टाफ नर्स एक, कंत्राटी आरोग्य सहाय्यक एक, सेवक दोन, अशी रिक्त पदे असल्यामुळे'

सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार पडत आहे तर उपकेंद्र पिंपळगाव येथे कायम नर्स एक, एमपीडब्ल्यू एक, हुनगुंदा येथे एमपीडब्ल्यू एक, अर्जापूर येथे कायम व कंत्राटी नर्स दोन, आरळी येथे कायम व कंत्राटी नर्स दोन, माचनूर येथे सर्व पदे भरलेली अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिकेची गरज :

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर २४ गावांसह पंधरा हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या कुंडलवाडी शहराचा मोठा भार पडत आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी पुरवठा व सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत.

औषध निर्माता पद रिक्त असल्यामुळे रुग्णांना नर्स किंवा सेविका यांच्या हस्ते सर्रास गोळ्या देण्याचा प्रकार चालू असल्यामुळे रुग्णाच्या जीवितेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या वेळेस अतिगंभीर अपघातग्रस्त झालेल्या रुग्ण रुग्णालयात आला तर त्यांच्यावर पुढील उपचारासाठी नांदेड किंवा इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका नाही.

नागरी दवाखाना नावालाच -

कुंडलवाडी शहराची लोकसंख्या पंधरा हजाराच्यावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णांचा भार कमी करण्याच्या अनुषंगाने शहरातील मिलिंद विद्यालय शाळेच्या जुन्या इमारतीत गेल्या पाच महिन्यांपूर्वी नागरी दवाखाना चालू करण्यात आला.

सदरील दवाखाना हा सकाळी ८ ते दुपारी १२ः३० पर्यंत चालू असून सद्यस्थितीत या रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्लू एक, नर्स एक, सेवक दोन आदी कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील रुग्णालयावर शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करूनही रुग्णांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT