file photo
file photo 
नांदेड

शेतकऱ्यांसाठी ‘या’ ठिकाणी मातीपरीक्षण केंद्राची स्थापना

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - अत्याधुनिक सोयीसुविधांसह सुसज्ज मातीपरीक्षण केंद्राची लिंगापुर येथे स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे व पाण्याचे नमुने तपासण्यात येणार असल्याची माहिती संचालक भागवत देवसरकर यांनी दिली. 

लिंगापूर (ता. हदगाव) येथील छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राची सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज व अत्याधुनिक मशिनरी व तज्ज्ञ, प्रशिक्षित मनुष्यबळासह स्थापना करण्यात आली आहे. 

योग्य मार्गदर्शन केले जाणार
शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे व पाण्याचे नमुने तपासले जातील तसेच तपासणीनंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकाकरिता कशाची व घटकाच्या कमतरतेनुसार खताची मात्रा व योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

या शेतकऱ्यांना होणार फायदा
नांदेड, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राचा फायदा होणार आहे. सध्या या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये हळद, ऊस, केळी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग व इतर भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करत असतात. परंतु अद्यापही या भागातील शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जनजागृती झाली नाही. परिसरामध्ये माती परीक्षण केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना नांदेड, हिंगोली, यवतमाळ या ठिकाणी माती परीक्षण करण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे ही गरज ओळखून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लिंगापुर येथे माती परीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

माती परीक्षण करणे काळाची गरज
शेतकऱ्यांच्या शेतातील मातीमधील सर्व घटकांची तपासणी केली जाणार असून तपासणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा अहवाल देऊन ज्या घटकाची जमिनीत कमतरता आहे. त्यावर योग्य खताची मात्रा सांगून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासूनच खरीप हंगामामध्ये पेरणी करावी व आपल्या जमिनीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे, याची माहिती घ्यावी. आवश्यक खत मात्रानुसार आपल्या पिकांना देऊन भरघोस उत्पन्न काढावे, यासाठी माती परीक्षण करणे ही काळाची गरज आहे, माती व पाणी परीक्षण करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून खरिप पिकाच्या संदर्भात जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

Slovakia Prime Minister : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या; जखमी अवस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Pune News : धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

PM Modi : विकसित आणि सशक्त भारतासाठी महायुतीला मतदान करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आवाहन

SCROLL FOR NEXT