Sugar mill photo.jpg 
नांदेड

पेरणीपूर्वी कारखान्यांनी थकित ‘एफआरपी’ द्यावी.....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड विभागातील साखर कारखान्यांकडे मागील वर्षीची थकीत एफआरपी रक्कम अद्याप प्रलंबित आहे. पेरणी अगोदर साखर कारखान्यांकडील थकित रक्कम शेतकऱ्यांना देण्यास प्रशासनाने भाग पाडावे अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगाेले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

अनेक कारखान्याकडे थकली एफआरपी 
ऊस गाळपाला गेल्यानंतर पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना भाऊराव चव्हाण, पूर्णा, टोकाईसह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकवली आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना संकटाच्या काळातही कवडीमोल दराने शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागला होता. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. 

शेतीमालाचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत
सध्या ऊस उत्पादक भागात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या हळदीचे दरही पडले आहेत. दहा ते बारा हजार रुपये क्विंटल विकणारी हळद सध्या पाच हजार ते सहा हजार क्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना उसाचे थकीत पैसे 
मिळाले तर पेरणीच्या कामाला येतील. यामुळे शेतकऱ्यांची येणे बाकी द्यावी असा आग्रह इंगोली यांनी धरला आहे.

दहा जूनपर्यंत थकीत रक्कम द्यावी
यासाठी प्रशासनाने सर्व कारखान्यांना सक्त ताकीद देऊन या आठवड्यात दहा जून पर्यंत थकीत शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रल्हाद इंगोले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कारखान्यांनी उसाची रक्कम वेळेवर द्यावी, यासाठी त्यांनी मुबंइ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली होती. यात अनेक कारखान्यांना थकीत एफआरपी द्यावी लागली होती. 

पालकमंत्र्यांनी कारखान्यापासून सुरुवात करावी 
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोना आजारातून  लवकर बरे व्हावेत यासाठी शेतकऱ्यासह सर्व नागरिकांनी प्रार्थना केली. दवाखान्यात उपचार घेत असतानाही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आदेशावरुन स्पीकअप इंडिया या अभियानात भाग घेतला होता. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे असलेली थकीत एफआरपी देण्याची सुरुवात करुन पेरणी अगोदर शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT