Nanded News
Nanded News esakal
नांदेड

लेकीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळला, शेतकरी कुटुंबाच्या घराचे स्वप्न केले पूर्ण

लक्ष्मीकात मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. हा सोहळा भव्यदिव्य व्हावा असे सर्वांना वाटते. सोहळ्यात, मौजमजा, विविध अन्नपदार्थ, मोठा मंडप, एखाद्या ऐतिहासिक स्थळाचा देखावा उभा करणे, हजारों पाहुणे मित्रमंडळींची उपस्थित यावर भर दिला जातो. पण या सर्व गोष्टींना फाटा देत आपल्या अन्नदात्यांविषयी कृतज्ञता म्हणून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यातील डॉ मिलिंद भोई यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील (Farmer Suicide) महिलेला सुंदर असे घर बांधून देण्याचा संकल्प केला. हा संकल्प लवकरच पूर्ण होणार असुन लवकरच नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. शहरातील कृष्णानगर परिसरात घर बांधण्यात येत असून हे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. (Father Avoid Unwanted Expenditure On Daughter Marriage, Being Construct Home Of Farmer Family In Nanded)

अर्धापूर (Ardhapur) तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच पुण्यातील विविध कुटुंबात दहा दिवस या शेतकरी कुटुंबातील सदस्य दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच हे कुटुंब सुशिक्षित व आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. या प्रतिष्ठानच्या वतीने पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांच्या गायत्री या लाडक्या लेकीच्या लग्नाची एकीकडे तयारी सुरू झाली तर दुसरीकडे अर्धापूर शहरातील लक्ष्मी साखरे यांच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून बांधकाम अंतिम टप्प्यात असे जाईल याची काळजी घेतली जात होती. शहरातील अहिल्यादेवीनगरात राहणाऱ्या लक्ष्मी साखरे यांच्या पतीने नापिकी‌‌ व कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना दोन छोट्या मुली व एक मुलगा आहे. अत्यल्प शेती, घरात कर्तापुरुष नाही. अडचणींचा डोंगर, पाल्यांचे शिक्षण आदी अडचणीतून हे कुटुंब मार्ग काढत असताना त्यांच्या मदतीला भोई प्रतिष्ठान धावून आले. डोक्यावर आपल्या हक्काची छत असावं हे प्रत्येकाचे स्वप्न. पण हे स्वप्न साकार होतेच असे नाही. घरी कर्तापुरुष नसला की आणखीन अवघड होते. या शेतकरी कुटुंबाला मायेचा ओलावा डॉ मिलिंद भोई यांनी देऊन लक्ष्मी साखरे यांच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. (Nanded)

डाॅ मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह सोहळा शनिवारी (ता २२) पूण्यात ऋषिकेश गोसावी यांच्याशी संपन्न होणार आहे. या नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पुढील महिन्यात संपन्न होणार आहे. शहरातील कृष्णा नगर परिसरात हे घर बांधण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या बांधकामासाठी पूण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, नागोराव भांगे, डॉ वैभव पूरंदरे , सुधाकर टाक, दिलीप डाढळे, दत्ता टोकलवाड, पुरभाजी कानोडे, अमृता इंदेवाड, राजु लोणे , शंकर ढगे, प्रल्हाद माटे, गजानन मेटकर, शेख जूबेर , उद्धव सरोदे, दिगांबर सोळंके, जावेद मिस्त्री आदींचे सहकार्य लाभत आहे. आपल्या अन्नदात्यांविषयी कृतज्ञता ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शेतकरी कुटुंबात अडचणी येतात. हा अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. एका सामाजिक जाणीवेतून हा संकल्प केला. तो पूर्ण होत आहे. विवाह सोहळ्यात आहेर न‌ देता शैक्षणिक साहित्य द्यावे अशा भावना डॉ मिलिंद भोई यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT