File Photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील पाच पॉझिटिव्ह रुग्ण ‘कोरोना’मुक्त 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, बारड (ग्रामीण) कोविड केअर सेंटर व यात्री निवास एनआरआय कोविड सेंटर येथे उपचार सुरु असलेल्यांपैकी पाच पॉझिटिव्ह व्यक्तींचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता.२१) त्या सर्वांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
 
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नांदेडकरांची चिंता वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक चित्र बघायला मिळत आहे. बुधवारी (ता.२०) सहा पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र, आनंदाचे वातावरण असतानाच काही तासातच पुन्हा चार नवीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा आनंद जास्त काळ टिकु शकला नव्हता. गुरुवारी (ता.२१) देखील पाच जण घरी जात असताना बुधवारप्रमाणे पुन्हा संध्याकाळी पॉझिटिव्ह रुग्णांची भर तर पडणार नाही ना? अशी मनात शंका उपस्थित होत होती. 

६२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार

जिल्ह्यातील आत्तापर्यंत ११० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत ४१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर ६२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. गुरुवारी घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील तीन, बारड (ग्रामीण) एक, एनआरआय यात्रीनिवास येथील एक अशा पाच रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

१८२ जणांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण

आत्तापर्यंत दोन हजार ७८१ संशयित म्हणून तपासणी केली होती. त्यापैकी दोन हजार ५७८ क्वारंटाइन करण्यात आले होते. यापैकी एक हजार १८२ जणांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. अजून १५७ जणास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून यातील ६१ जणांना रुग्णालयात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर घरीच क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या दोन हजार ५१७ इतकी आहे. गुरुवारी (ता.२१) पुन्हा ६६ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख २६ हजार ७१६ इतके आहेत. त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला असून त्यांच्या हातावर शिक्केही मारले आहेत.  

जिल्ह्यातील स्थिती-
-एकुण नमुने तपासणी- दोन हजार ८२७
-एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- ११०
- पैकी निगेटिव्ह - दोन हजार ४६१ 
- नमुने तपासणी अहवाल बाकी- १३०
- नाकारण्यात आलेले नमुने - १४
- अनिर्णित अहवाल - १०९
- कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - ४१
- कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - पाच
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT