file photo
file photo 
नांदेड

पतंग उडवा पण...सावधगिरीही बाळगा ! महावितरणचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मकर संक्रात म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यानाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो. याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित ठिकाणी व वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावेत असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागे अभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पंर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांकीत अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे संक्राती सारख्या आनंददायी सणाला गालबोट लागू नये याकरिता योग्य खबरदारी घेवूनच पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत. पालकांनी दक्ष राहून मुलांना पतंग उडविण्यासाठी मार्गदर्शन करावे.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज लागल्यास, नजीकच्या महावितरणच्या कार्यालयाशी किंवा चोवीस तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

धातूमिश्रित मांजा ठरु शकतो घातक

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असते असा मांजा वीजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून वीज प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत  काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करावा.
- दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ

हे लक्षात ठेवा…

1.विजेच्या तारांवर अडकलेले पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
2.तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
3.वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
4.तारात अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT