file photo  
नांदेड

स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटांकडे द्या, कोण म्हणतंय, ते वाचा... 

सकाळवृत्तसेवा

नांदेड : धनेगाव (ता. नांदेड) येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एक परवानाधारक नारायण कवाळे यांनी धान्य वाटप करताना कच्ची पावती देणे, धान्य कमी देऊन ग्राहकांची लुट केल्याप्रकरणी त्यांचा परवाना निलंबित केला आहे. शिधापत्रीकाधारकांची सोय व्हावी, या उद्देशाने निलंबित दुकानांतर्गत शिधापत्रीका मुजामपेठ येथील दुकान क्रमांक दोनला जोडण्यात आल्याने शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होत असून निलंबीत स्वस्त धान्य दुकान कायमस्वरुपी महिला बचतगटाकडे देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी केली आहे. 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन कालावधीत मजुर, कामगार व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन रास्त भाव दुकानामार्फत स्वस्त व मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. शासन निर्देशानुसार लॉकडाउन गरीब, गरजुंसाठी मागेल त्यास धान्य उपक्रमांतर्गत धान्य वाटप करण्यात आले. मात्र धनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकचे परवानाधारक नारायण कवाळे यांनी मनमानी पद्धतीने वेळेत धान्य वाटप न करणे, धान्य वाटपामध्ये अनियमितता करणे, ग्राहकांना सुविधा न देणे, ग्राहकांना पक्की पावती न देणे, धान्य कमी देणे अशी अनियमितता केली. 

हे ही वाचानांदेड कोरोना ः आज दिवसभरात १० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
 
या शिवाय शासनाने रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्री केल्याच्या समिती अहवालावरुन त्यांचा स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित करण्यात आला. त्यानुसार निलंबित स्वस्त धान्य दुकानांतर्गत शिधापत्रीकाधारकांची गैरसोय दूर होऊन त्यांना धान्य कोठा वाटपाचा लाभ मिळावा, या उद्देशाने प्रशासनाने मुजामपेठ येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोनकडे धनेगावच्या शिधापत्रीका जोडण्यात आल्या आहेत.  
 
दरम्यान, धनेगाव येथील ग्रामस्थांना मुजामपेठ येथे धान्य घेण्यासाठी काही मैल पायपीट करावी लागते. या शिवाय मुजामपेठ येथील स्वस्त धान्य दुकानदार चालक यांच्याकडे अगोदरच धान्य वाटपाचा अधिकभार असल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे केल्या आहेत.

शासन निर्णयानुसार धनेगाव येथील निलंबीत दुकान क्रमांक एक गावातील महिला बचत गटाकडे कायमस्वरुपी चालवण्यासाठी देण्यात यावे. त्यामुळे नागरीकांची गैरसोय दूर होउन गरीब, गरजुंना धान्य वाटपाचा सुरळीत लाभ मिळेल. 

ग्रामपंचायत कार्यालयास प्राप्त नागरिकांच्या तक्रारीनुसार धनेगाव येथील निलंबित स्वस्त धान्य दुकान परवाना गावातील महिला बचत गटाकडे देण्याच्या ग्रामपंचायत ठरावासह जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे, सरपंच दिलीप गजभारे, उपसरपंच पिंटू पाटील शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे येथील स्वस्त धान्य दुकानाचा कायमस्वरुपी प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT