Nanded News 
नांदेड

Video : नांदेडची गोदामाता ‘का’ गुदमरली, वाचा कारण

प्रमोद चौधरी

नांदेड : एखाद्या लोकसंस्कृतीचा वारसा ही शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदीदेखील असू शकते. नेमके हेच भाग्य नांदेडला गोदावरीच्या रूपाने लाभले आहे. मात्र, तिचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. नांदेड शहरातील अनेक नाले, मैला नदीत मिसळत असल्याने गोदामाता गुदमरते आहे.

नदीचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सूचक तपासण्या केल्या जातात. गोदावरी नदी कुठल्या घटकांमुळे प्रदूषित होत आहे. यासंबंधी धोक्याची घंटा महामंडळाकडून वेळोवेळी दिली जात असते. गोदावरी नदीपात्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी दरमहा नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सद्यःस्थितीत काळेश्वर, डंकिन, नगिनाघाट, जूना पूल, अमदुरा बंधारा, येळी आदी ठिकाणी आलटून-पालटून पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यात प्राणवायू (आॅक्सिजन), रसायने (केमिकल) यासह विविघ घातक घटकांचे प्रमाण तपासले जाते. 

गोदावरी नदीच्या देगलूर नाका परिसरातील जुन्या पुलाजवळील गोदावरी नदीच्या पात्रात ‘बायोलाॅजिकल आॅक्सिजन डिमांड’ म्हणजे जलचर प्राण्यांना आवश्यक त्या प्रमाणात प्राणवायू मिळतो आहे की नाही?  याची तपासणी करणे, त्याचे मानक ३० मिलिग्रॅम पर लिटर आहे का? आदींची तपासणी करण्याची गरज आहे.  फेब्रुवारी २०१५ मध्ये अशी तपासणी केली होती. त्यावेळी तेथे ‘बायोलाॅजिकल आॅक्सिजन डिमांड’चे प्रमाण ३२ मिलिग्रॅम पर लिटर आढळले होते. तरीही गोदावरीच्या पात्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी जलचर प्राण्यांना धोका संभवत असून महापालिकेला ही धोक्याची घंटा आहे. नाले, मैला गोदावरीत मिसळत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष आहे. यामुळे पाणी प्रदूषित आणि पिण्यास अपायकारक आहे, हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही.

पाण्याला हिरवा रंग कसा
गोदावरीचे पाणी सद्यस्थितीत हिरवे दिसत आहे. मात्र, नांदेड महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना विविध उपाययोजनांबाबत अद्यापही अनभिज्ञच आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी विशेष सूचना दिलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यात पाण्याचा रंग हिरवा का? याचा शोधही अद्याप यंत्रणेला तज्ज्ञांच्या मदतीने घेता आले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

हे देखील वाचाच - नांदेडमध्ये टेन्शन : पंजाबला पळालेले 9 भाविक कोरोनाग्रस्त, दोन राज्यांत गुन्हा दाखल
 
पावित्र्याचे होतेय हरण
गोदावरी नदी प्रदूषित झाल्याविषयी वारंवार सरकार, प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. त्यात आमदुरा (ता.मुदखेड) येथील बंधाऱ्यातील जलसाठ्यात घातक रसायने मिसळल्याने ते नागरिकांसह जनावरांना पिण्यायोग्य नाही. यासंदर्भात महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पाटबंधारे विभाग जबाबदारीत चालढकल करीत आहेत. नांदेड शहरातील १७ नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळते. सांडपाणीही सोडले जाते. या स्थितीमुळे गोदावरी प्रदूषित झाली असून तिचे पावित्र्य हरण झाल्याचे खेदाने नमूद करावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : पुण्यात ठाकरे गटाला जबरदस्त धक्का; सुतार–भोसलेंची भाजपमध्ये थेट एन्ट्री; कोथरूड–येरवड्यात राजकीय भूकंप!

MS Dhoni मुळे तुझ्या कारकिर्दीचं वाटोळं झालं? अमित मिश्राने स्पष्टच बोलाताना सांगितले की 'तो नसता तर कदाचित...'

Latest Marathi News Live Update : हिंदू संघटनांचे मुंबईत आंदोलन

DG Loan Scheme: महाराष्ट्र पोलिसांच्या घराचं स्वप्न साकारणार! ‘डीजी लोन’ योजना सुरू, राज्य सरकारचा मोठा निर्णय, लाभ कसा मिळणार?

Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ‘’हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...’’

SCROLL FOR NEXT