file photo
file photo 
नांदेड

बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन नियमित शुल्कासह www.mahasscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सोमवार (ता. 18 जानेवारी) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने मंगळवार (ता. पाच) ते सोमवार ता. 18 जानेवारी हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream)पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या ता. 5 ते 18 जानेवारीपर्यंत आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत सोमवार ता. 25 जानेवारी पर्यंत आहे.

पूर्वसूची चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी

अर्ज भरावयाच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत पूर्वसूचीवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर पूर्वसूची चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.

परीक्षेचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व पूर्वसूची जमा करण्याची मुदत ता. 28 जानेवारीपर्यंत राहील. इयत्ता 12 वी परीक्षेचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

सरल डाटावरुन नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची 

कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. शासन निर्णय 14 ऑगस्ट 2020 नुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित विद्यार्थ्यांची विज्ञान, कला व वाणिज्य शाखांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी सरल डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. या सरल डाटावरुन नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांची माहिती सरलडाटावर उपलब्ध नाही त्यांनी ऑल अप्लीकेशनच्या लिंकमधून प्रचलीत पद्धतीने अर्ज भरावीत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची, पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL Data मध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे कॉलम नं. 3 नुसार निश्चीत करण्यात आल्या आहेत. 

जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची

सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. यावर्षी नव्याने फॉर्म नं. 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची सन 2021 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार असल्याने उपरोक्त कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येवू नयेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करुन चलनावरील नमूदप्रमाणे मंडळाच्या Virtual Account मध्ये एनइएफटी किंवा आरटीजीएसद्वारे वर्ग करावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी एनइफटी किंवा आरटीजीएसद्वारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अंकाऊट नंबर व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदर रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील.

अर्ज भरण्याची मुदत वाढीनंतर पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही

सन 2021 मधील परीक्षेसाठी फेब्रुवारी- मार्च 2020 अथवा नोव्हेंबर- डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळीसर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापुर्वीच असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही. याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात याव्यात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नियमित अर्ज भरण्याची मुदत वाढीनंतर पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT