जूनी पुस्तक परत करा अभियान 
नांदेड

जुनी पाठ्यपुस्तके परत करा उपक्रमाला बिलोलीत चांगला प्रतिसाद

समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने राज्यभरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला- मुलींना राज्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.

विठ्ठल चंदनकर

बिलोली ( जिल्हा नांदेड) : राज्य शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके यंदा विलंबाने मिळणार असल्याने मागील वर्षीची जुने पाठ्यपुस्तके परत मागून घेण्याचा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यास बिलोली तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ९० टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी जुनी पाठ्यपुस्तके परत करताना दिसून येत आहेत.

समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने राज्यभरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला- मुलींना राज्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दीड वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच यंदा पाठ्यपुस्तकांची छपाई झाली नाही. ता. 15 जूनपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्याविनाच यंदाचेही शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. मुलांच्या परीक्षा न झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्यात आली आहे.

हेही वाचा - भारतात हजारो वर्षापासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणात मागासलेल्या समाजातील मुलां- मुलींसाठी शाळा काढल्या.

यंदा पाठ्यपुस्तकांची छपाई उशिराने होत असल्यामुळे मुलांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर आदींनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुलांकडून जुने पाठ्यपुस्तके मागवून घेण्याचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.

त्यादृष्टीने सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपापल्या तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्यासाठी नियोजन लावले. बिलोलीचे गटशिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे यांच्यासह शिक्षण विस्ताराधिकारी व सर्व केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यानुसार बिलोली तालुक्यातील सर्व शाळेत सरासरी ९० टक्के पेक्षा अधिक जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्यात आली असून त्याचे वाटपही जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे.

येथे क्लिक करा - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला २००९ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आलं होतं.

सध्या जुने पुस्तके परत घेणे व पुढील वर्गातील मुलांना वाटप करण्याचे काम सुरु आहे. केंद्रप्रमुख माधव लोलमवाड, केंद्रप्रमुख श्री. कौटकर, केंद्रप्रमुख श्री. येसके यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २३) बिलोली येथील पूज्य साने गुरुजी विद्यालयात जमा करण्यात आलेली जुनी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT