Nanded Photo 
नांदेड

सरकार घरात बंदिस्त असलेल्यांच्या पोटाची सोय काय...?

शिवचरण वावळे

नांदेड : लॉकडाउनमध्ये अडकुन पडलेल्या परप्रांतियांची जेवणाची आणि राहण्याची गैरसौय होत आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु, जे स्थानिक रहिवाशी आहेत. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी राहत आहेत. परंतु, त्यांच्याकडे रेशन कार्डच नाही. अशा सामान्य कुटुंबाकडे घरात खायला अन्नाचा कन सुद्धा नाही. यामुळे त्यांची दोनवेळच्या जेवणाची आबाळ होत आहे. 

सांगवी परिसरातील एका चालकास कोरोनाची बाधा झाल्यापासून हा भाग कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील रोजमजुरदारांकडे रेशन कार्ड नाही. म्हणून  त्यांना कुणीही धान्य देत नाही की कुणी मदतीसाठी पुढे येत नसल्याने कुणीतरी आमच्या अन्न पाण्याची सोय करा हो मायबाप असा टाहो या ठिकाणच्या मजुरदार कुटुंबियांकडून होत आहे.   

सांगवी परिसरातील काही कुटुंबियांवर आठ दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. यादरम्यान त्यांनी लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला मात्र कुणाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हे कुटुंब अक्षरशः हतबल झाले आहे. त्यांच्या मदतीस ना लोकप्रतिनिधी धावून येत आहेत ना प्रशासन त्यांच्या हकेला ओ देत आहे. 

काय खावे आणि कसे जगावे

काळ इतका वाईट येईल असे कुणाला ठाऊक होत. आमच्याकडे ना रेशन कार्ड आहे ना खिशात पैसे, दीड महिण्यापासून घरात बंद आहोत. सुरुवातीच्या काळात एका स्वंयसेवी संघटनेकडून पाच किलो धान्याची किट मिळाली. ती किती दिवस जाणार, आठ दिवसांपासून अनेकांना फोन करतोय पण आमच्या प्रश्नाकडे कुणीच लक्ष देत नाही. रेशन दुकानदार दारात उभे करत नाही. आम्ही काम करायला तयार आहोत. पण कामच मिळत नाही, काय खावे आणि कसे जगावे. आम्ही जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत फोन केले पण उपयोग झाला नाही.
- प्रशांत पाठक (सांगवी)    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT