nanded news 
नांदेड

Video : नांदेड शहरात केला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान, कशासाठी? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला. परिणामी, सर्वजणच घरात बसून आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवा देणारे आरोग्य विभागातील तसेच पोलिस कर्मचारी मात्र कठोरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यांना आज खरी गरज आहे पाठबळाची.

आपल्यासाठी जे डाॅक्टर, नर्स व रुग्णालय कर्मचारी आज कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना सुद्धा आपला परिवार आहे. कोणाला आई वडिल आहे तर कोणाला मुले, बायको आहे तर कोणी आई आहे, बहीण आहे तर कोणी पत्नी आहे. असे हे सर्व आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. आज कोरोनाच्या महामारीत सर्वच जण कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यातल्या त्यात डाॅक्टर व कर्मचारी यांच्यावर असलेला ताण, त्यांची मानसिकता याचा विचार व्हायला पाहिजे. 

गरज आहे पाठबळाची
कोरोना विषाणूला हरविण्यासाठी आरोग्यसेवेतील डाॅक्टर तसेच कर्मचारी सगळ्यांत आघाडीवर आहेत. रुग्णांच्या संपर्कामुळे त्यांच्या जिवाची जोखीम सर्वाधिक आहे. रुग्णालयांमध्ये उपचार करणारे डाॅक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, घरोघरी जाऊन तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका असे अनेक घटक थेट रुग्णांच्या संपर्कात येऊन, या साथीचा फैलाव रोखण्यासाठी लढत आहेत. त्यामुळेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना पाठबळाची आवश्यकता आहे. 

कोरोनाने बदलवली मानसिकता
कोरोनाच्या या महामारीत आज गरीबाची ओळखली जाणारी सरकारी रुग्णालये मात्र श्रीमंत-गरीब हा भेदभाव सोडून काम करीत आहे. समाजात सरकारी रुग्णालय असोत की विमानसेवा असोत कि सरकारी शाळा असोत त्यांच्याकडे पाहण्याची जी मानसिकता होती ती कोरोनाने बदलवून टाकली आहे. पंचतारांकित रुग्णालय आज नसल्यासारखी झाली आहे. अनेक ठिकाणचे डाॅक्टर्स आपल्यासारखेच घरी बसले आहे. 

मात्र, आपली सेवा करीत आहे ती सरकारी यंत्रणा. अशावेळी सरकारी यंत्रणा आपले कर्तव्य म्हणून उभी असली तरी आपले सर्वांचे सहकार्य त्यांना पाहिजे. त्यांना समजून घेण्याचे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे, ते करीत असलेल्या सेवाचे. कोरोनाच्या साथीने जगासमोर मोठे संकट उभे केले असून, हजारो बळी जात आहेत. या थैमानाला थोपविण्यासाठी आपले आरोग्य कर्मचारी झटत आहेत. पोलिस कर्मचारी रस्त्यावर उन्हा-तान्हात उभे राहून नागरिकांना हात जोडून घरातच थांबण्याची विनंती करत आहेत.  त्यामुळे त्यांच्या परिवाराची रक्षा करण्यासाठीही आपणही सज्ज झाले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT