नांदेड

विजेचा शॉक लागून जारीकोटमध्ये सहा गुरे जागीच दगावली

सुरेश घाळे

जारीकोट येथेही वादळी वाऱ्यामुळे तलावालगत असलेल्या दिग्रसचे ग्रामसेवक वाघमारे यांच्या शेतात विजेच्या तारा पडल्या.

धर्माबाद (नांदेड) : धर्माबाद तालुक्यात शनिवारी (ता.२९) पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) झाला. चिकना परिसरात थोडाफार गाराही पडल्या. जारीकोटमध्ये वादळी वाऱ्यामुळे विद्युत वितरणची (Power distribution) सुरू असलेली विजवाहिनी (Power line) शेतात पडली. तेथूनच काही गुरे तलावात पाणी पिऊन चरण्यासाठी जात होती. त्याच दरम्यान गुरांना विजेचा धक्का लागून सहा गुरे जागीच दगावल्याची घटना रविवारी (ता.३०) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. (In dharmabad taluka, buffaloes and cows died due to electric shock in jarikot)

धर्माबाद तालुक्यातील जारीकोट, सायखेड, चिकना, रोषणगाव परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चक्रीवादळसदृश्य वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे दूरपर्यंत उडाली. निरगिरी, लिंब, बाभूळ, चिंच, आंबा अशी अनेक झाडे उन्मळून जमिनीवर आडवी झाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून झाडे तारांवर पडल्याने विजवाहिनीच्या ताराही तुटल्या. रात्रीची वेळ होत असल्याने विजवितरणचे कर्मचारीकडे दुर्लक्ष केले. जारीकोट येथेही वादळी वाऱ्यामुळे तलावालगत असलेल्या दिग्रसचे ग्रामसेवक वाघमारे यांच्या शेतात विजेच्या तारा पडल्या.

जारीकोट येथील शेतकरी श्रीरंग रामोड यांचा सालगडी गुरांना चरण्यासाठी रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तलावाकडे नेला. तेथे गुरे पाणी पिऊन चरण्यासाठी नेत असताना शेतात पडलेल्या विजवाहिणीचा स्पर्श गुरांना होताच विजेचा धक्का त्यांना लागला. त्यात सहा गुरे जागीच दगावली. यात तीन म्हशी, तीन गायींचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान महावितरण कंपनीने ही भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. महावितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे अशी घटना घडल्याचे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. (In dharmabad taluka, buffaloes and cows died due to electric shock in jarikot)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT