शासकिय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड 
नांदेड

International Nurses Day-2021: रुग्णांना धीर देऊन त्यांच्यावर मायेची फुंकर घालणारी कर्तव्यदक्ष स्त्री

रुग्णांची सेवा कोण करतं ? हा प्रश्न केल्यावर डॉक्टरांबरोबरच आता नर्सचे नाव पुढे येते, आणि हे सद्य परिस्थितीत वास्तव आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : ता. 12 मे जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. परिचारिका अर्थांत नर्स म्हणजे रुग्णांना धीर देऊन त्यांच्यावर मायेची फुंकर घालणारी एक दयाळू व मायाळू आणि कर्तव्यदक्ष स्त्री होय. रुग्णांचे प्राण वाचावेत, त्यांची प्रकृती सुधारावी, यासाठी जीवाचा आटापिटा करुन अहोरात्र कार्यरत (Corona virus) राहणाऱ्या परिचारिकेचे दैनंदिन जीवन अतिशय खडतर व कष्टमय होत चालले आहे. आराम, विश्रांती, विरंगुळा हे शब्द त्यांच्या जिवनातुन निघून गेलेत की काय असे चित्र रोज बघायला मिळत आहे. International Nurses Day-2021: A Dutiful Woman Who Patients Patients

रुग्णांची सेवा कोण करतं ? हा प्रश्न केल्यावर डॉक्टरांबरोबरच आता नर्सचे नाव पुढे येते, आणि हे सद्य परिस्थितीत वास्तव आहे. परिचारिका भगिनी कोरोना-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णसेवेत इतक्या व्यस्त झाल्याकी, स्वतः सह त्यांना आपल्या कुटुंबियांकडे लक्ष देण्यास वेळच नाही त्यामागील भावनिक कारण म्हणजे फक्त आणि फक्त रुग्ण सेवाच यालाच त्या आपले कुटुंब समजायला लागतात. खरं तर, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांच्या या निः स्पृह सेवेला नतमस्तक व्हावे असेच त्यांचे कार्य सुरु आहे.

हेही वाचा - एअर इंडियाचे नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा पुन्हा लॅन्ड; मात्र जुन महिन्याची बुकिंग सुरु

वास्तविक पहाता, जगाला सर्वप्रथम रुग्णसेवेची ओळख करुन दिली ती लंडनमधील फ्लॉरेन्स नाईटिंगल या परीचारिकेने. रुग्णांना सर्वोत्तम वैद्यक सेवा मिळावी, या उद्देशाने तिने लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये मॉडर्न नर्सिंग स्कुलची स्थापना केली. प्रशिक्षण काळात नर्सेस यांना स्कॉलरशिप देण्याची पद्धत यु. के. मध्ये सर्वप्रथम सुरु करण्याचे श्रेय फ्लॉरेन्स नाईटिंगल या परीचारिकेस जाते. फ्लॉरेन्सची महत्त्वपूर्ण कामगिरी जिचे जगभरात कौतुक झाले, ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धात रणांगणावर जखमी अवस्थेत पडलेल्या सैनिकांवर तिने आपल्या नर्सिंग स्कूलच्या आरोग्य पथकासह जागीच उपचार करण्याचे साहस दाखविले. तिने हातात lamp घेऊन जखमी सैनिकांना शोधून काढत त्यांच्यावर उपचार करुन अनेकांचे प्राण वाचले. या पार्श्वभूमीवर फ्लॉरेन्स नाईटिंगल हिला "दिवा घेतलेली स्त्री"(The lady with the lamp) असे संबोधिले जाते. या पार्श्वभूमीवर फ्लॉरेन्सचा 12 मे (१८२०) हा जन्म दिवस विश्वात 'परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी परिचारिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय किट वाटण्याची प्रथा ही प्रचलित आहे. या परिचारिकेच्या समर्पणवृत्तीचा आदर्श घेऊन भारतीय परिचारिकांही आपली रुग्णसेवा यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत.

कोविड- 19 महामारीच्या कोरोना व्हायरसने जगात हाहा: कार माजवला आहे. त्यामुळे लाखो निरपराध लोक बाधीत होऊन उपचार घेत आहेत. मोठ्या संख्येने लोक हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी झुंज देताहेत. वैश्विक स्तरावर नागरिकांमध्ये भय व चिंतेचे वातावरण पसरले असून संपूर्ण जग ताणतणावात गुरफटला आहे. कोविड- 19 या महामारीच्या माध्यमातून जसं काही जैविक युद्धाचा प्रारंभ झाला आहे की काय, असा संशय येतो. चीन अमेरिकेसह सुमारे दीडशेहून अधिक राष्ट्रे कोरोनाचे शिकार झाले आहेत. तर भारतात महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक कोरोनाची झळ पोहोचली आहे. प्रत्येक राज्य कोरोनाशी लढा देण्यासाठी कारगर व्यूहरचना करत आहेत. देशासह राज्यांना अधिक सतर्क होऊन ठोस उपाययोजना कराव्या लागत आहेत.

येथे क्लिक करा - Good News : हिंगोलीत कोरोनामुक्त रुग्णांना वृक्ष भेट, या रुग्णालयाचा आदर्श उपक्रम

भारतात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत परिचारिका भगीनींचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. लसीकरणाबरोबरच दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांवर उपचार करुन, त्यांचे प्राण वाचविण्याची शिकस्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनखाली परिचारिकांना करावी लागत आहे. आजच्या संकटमय घडीला आमच्या परिचारिका भगिनींही खांद्याला खांदा लावून रुग्णसेवेची मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी देखील कोविड- 19 या विषाणूचा खातमा करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता, केंन्द्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्याची आपत्कालीन व्यवस्थापन, विभागीय व जिल्ह्यांचे प्रशासन, महापालिका, आरोग्य यंत्रणा, स्वच्छता यंत्रणा आणि हे सर्व युद्धपातळीवर कोरोनाशी लढा देताहेत. कोरोना हारेल देश जिंकेल हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जिवापलिकडे प्रयत्न करत आहेत. आता लढायच अन् कोरोनाविरुद्ध जिंकायचं हे पण आपल्या डॉक्टर परिचारिकांनी घेतला आहे.

राज्यातील योद्धा परिचारिका ह्या आपलं घरदार विसरुन कोरोनाशी लढा देत, महाराष्ट्रीयांचे प्राण वाचविण्यासाठी पूर्णक्षमतेने मैदानात उतरल्या आहेत.

आता माघार नाही, असा निर्धार करुन परिचारिका भगिनी " आम्ही शुर सरदार, आम्हा काय कुणाची भीती" असे ठणकावून सांगत कोरोनाचा पाडाव करण्यास वचनबद्ध आहेत. चला तर, आपण सर्वजण आपल्या परिचारिका भगिनिंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुया कारण 'त्या' कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवून, कोविड19 चा नाश करण्यासाठी कटिबद्ध आहेत. परिचारिका भगिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि त्यांच्या रुग्णसेवेला मानाचा मुजरा

लेखन विजय होकर्णे यांच्या माहिती व संकलनातून साभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT