नांदेड : शासनाच्या विविध योजना मुलींपर्यंत पोहचून सक्षम बनविण्यासाठी प्रत्येक योजनेची माहिती गावा- गावापर्यंत देऊन त्यांच्या सक्षमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत प्रशिक्षकांना जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी सुचण्या दिल्या. तसेच भविष्यात बालविवाह होणार नाही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन बालविवाहाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन केले.
महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरचेंज कम्युनिकेशन(एसबीसी-३) हे आपले मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासना सोबत जिल्ह्यातील बाल विवाह निर्मूलनासाठी एकत्रितपणे काम करत आहेत.
जिल्हा पातळीवर बालविवाह प्रकरणात हस्तक्षेप करणे आणि अशा असुरक्षित कुटुंबांना आणि मुलांना आधार देणे या बाबत सुपरवायझर ( एलएचव्ही) आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे कंत्राटी जिल्हा समन्वयक, एकात्मिक बाल विकास प्रकल्प पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी यांच्या मार्फत अग्रभागी कर्मचारी वर्गात जागृकता वाढविण्या हेतू ता. आठ व ता. नऊ फेब्रुवारी, रोजी शिवाजीनगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत दीड दिवसाचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (टीओटी) आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे आणि पूजा यादव, राज्य अधिकारी, बाल विवाह निर्मूलन प्रकल्प एसबीसी -३ युनिसेफ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेदहा ते ११ वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनिल शिंगणे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. निरंजन कौर, एसबीसी 3 चे संस्थापक निशीत कुमार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.
येथे क्लिक करा - नांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940
सदर कार्यक्रमात ८० हुन अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना मुलींपर्यंत पोहचून सक्षम बनविण्यासाठी प्रत्येक योजनेची माहिती गावा- गावापर्यंत देऊन मुलींच्या सक्षमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत प्रशिक्षकांना जिल्हाधिकारी यांनी सुचण्या दिल्या. व भविष्यात बालविवाह होणार नाही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन बालविवाहाचे समुळ उच्चाटन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.