लाॅयन्सचा डबा 
नांदेड

लॉयन्सच्या डब्याची इंग्लंडकडे कूच; रंगनाथ देशपांडे यांच्याकडून दोनशे डब्याचे योगदान

मूळचे नांदेड निवासी असलेले रंगनाथ देशपांडे यांची कोविड संक्रमण काळात देशवाशियांची काहीतरी मदत करावी अशी तीव्र इच्छा होती. मनपाचे क्षेत्रीय अधिकारी कुमार कुलकर्णी यांच्या सल्ल्यानुसार लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलला एक हात मदतीचा पुढे केला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील लाॅयन्सचा डबा आता परदेशात पोहंचला आहे. या उपक्रमाला नुकतेच अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या परंतु नांदेडच्या एका दानशुर व्यक्तीने गरजु व कोरोना रुग्णांच्या (Corona virus) नातेवाईकांसाठी ३०० डब्यांचे योगदान दिले होते. हे वृत्त ताजे असतानाच पुन्हा इंग्लंडमध्ये (England) वास्तव्यास असलेल्या मुधोळकर दाम्पत्याने दोनशे डब्बे वाटप केले. बुधवारी (ता. पाच) स्नेहा व मंगेशकुमार मुधोळकर या नवपरिणीत जोडप्याने गरजूंना दोनशे डबे उभयतांच्या हाताने देऊन आपल्या लग्नाचा स्वागत समारंभ (Marriage Resption program) आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. Lions' coach marches to England; Contribution of 200 coaches by Ranganath Deshpande

मूळचे नांदेड निवासी असलेले रंगनाथ देशपांडे यांची कोविड संक्रमण काळात देशवाशियांची काहीतरी मदत करावी अशी तीव्र इच्छा होती. मनपाचे क्षेत्रीय अधिकारी कुमार कुलकर्णी यांच्या सल्ल्यानुसार लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलला एक हात मदतीचा पुढे केला. लॉयन्स परिवारातर्फे शंभर टक्के लोकसहभागातून चालवण्यात येत असलेल्या उपक्रमामध्ये बुधवारी ५०० डबे वितरीत करण्यात आले. त्यामध्ये कै. कृष्णराव देशपांडे व कै. डॅा. प्रभाकर टोके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंजली व रंगनाथ देशपांडे इंग्लंड यांच्यातर्फे रेल्वे स्थानक व बस स्थानकातील ३०० प्रवाशांना गोड जेवण देण्यात आले. भविष्यात देखील अॅड. दिलीप ठाकूर यांच्या समाजोपयोगी उपक्रमांना आर्थिक मदत करणार असल्याची ग्वाही देशपांडे यांनी मोबाईलवरुन बोलताना दिली.

हेही वाचा - लॉन्स मालकासह वधू पित्यावर गुन्हा दाखल झाला आहे

नांदेड जिल्हा भावसार क्षत्रिय समाजाचे सक्रीय कार्यकर्ते रामदास मुधोळकर यांचे चिरंजीव मंगेशकुमार यांचा विवाह स्नेहा यांच्या समवेत दोन मे रोजी संपन्न झाला. कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न साधेपणात उरकून घ्यावे लागले. बचत झालेल्या पैशाचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने पत्रकार अनिरुद्ध दांडगे यांच्या सल्ल्यानुसार या विवाहा प्रित्यर्थ रामदास मुधोळकर व परिवारातर्फे चैतन्यनगर परिसरातील तसेच वृद्धाश्रमातील २०० गरजवंतांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. पाचशे डबे वितरण करण्यासाठी दिलीपभाऊ ठाकूर यांच्या समवेत अरुणकुमार काबरा, संतोष ओझा, सुरेश शर्मा, राजेशसिंह ठाकुर, मन्मथ स्वामी, विशाल सरोदे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT