शेळ्यांनाही मास्क 
नांदेड

ऐकावे ते नवलच : नांदेड जिल्ह्यात या गावात कोरोना संसर्गापासून बचावासाठी बकऱ्यांनाही मास्क!

एकीकडे कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविल्याने शासन आणि प्रशासन या जीवघेण्या आजारापासून नागरिकांच्या बचावासाठी विविध योजना अमलात आणत असले तरी नागरिकांकडून शासनाने लावून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही.

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : एकीकडे कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविल्याने शासन आणि प्रशासन या जीवघेण्या आजारापासून नागरिकांच्या बचावासाठी विविध योजना अमलात आणत असले तरी नागरिकांकडून शासनाने लावून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, याचे पालन पाहिजे तशे होत नसल्याने ही महामारी आवाक्याबाहेर गेली आहे. तर दुसरीकडे मात्र माहूर या आदिवासीबहुल तालुक्यातील दत्त मांजरी गावात अल्पशिक्षित, अशिक्षित शेळी पालन करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांनी कोरोनापासून बचावासाठी चक्क बकऱ्यांना मास्क लावून त्यांची काळजी घेतली जात आहे.

माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथील गावकऱ्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी एक बैठक घेऊन त्रिसूत्रीचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच गावकरी विशेष खबरदारी घेत आहेत. सरकारी नियमांचे पालन इथे काटेकोरपणे केले जात आहे. अशातच जनावरांना देखील कोरोना होईल या भीतीने गावकऱ्यांनी जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय घेतला. बैठकीत ठरल्याप्रमाणे शेळ्यांना इथे मास्क घातला जातो. गोठ्यात बांधताना शेळ्यांना देखील अंतर ठेवून बांधले जाते आणि गोठ्यात सॅनिटायझरची फवारणी देखील केली जाते. शेळ्या चारायला नेताना गाव संपेपर्यंत मास्क काढला जात नाही. गावाबाहेर जंगलात मास्क काढला जातो आणि परत गावात येताना शेळ्यांना मास्क घातला जातो. या गावाची लोकसंख्या पंधराशे आहे. आतापर्यंत गावात दहाजणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कोरोनाबाबत भीती पसरली आहे. याच भीतीतून गावकऱ्यांनी जनावरांना देखील मास्क घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - वसमतमध्ये बंदचे आदेश डावलणाऱ्या आडत व्यापाऱ्यांना ४३ हजारांचा दंड

प्राणी नियम पाळत आहेत ते आपण ही पाळायला पाहिजे!

सध्या राज्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. माहूर तालुक्यात सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात आहे. हा तालुका आदिवासी, बंजारा बहुल असून या दत्तमांजरी या गावात बहुतांश नागरी आदिवासी जमातीचे असून त्यांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चा व्यवस्थित वापर केल्याने या गावात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या खूप कमी आहे. सोबतच बघण्यात आले आहे की पाळीव प्राणीसुद्धा सोशल डिस्टंसिंग घेऊन चरायला जातात. ही अतिशय चांगली बाब आहे. जे प्राणी नियमाप्रमाणे वागत आहे, तसे आपणही नियम पाळले पाहिजे.

- राकेश गिड्डे, तहसीलदार, माहूर.

बैठक घेऊन घेतला निर्णय...

शहरी भागा पाठोपाठ ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने आम्ही गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन जनावरांना मास्क लावणे, त्यांना चारा पाणी देण्यापूर्वी परिसर सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टंसिंगवर जनावरांना बांधणे हा निर्णय घेतला असेल मनुष्य बोलू शकतो पण जनावरांना वाचा नसल्याने ती बोलू शकत नाही. यासाठी आम्ही गावकऱ्यांनी ही काळजी घेतली आहे.

- मनोज कीर्तने, सामाजिक कार्यकर्ते, दत्तमांजरी, ता. माहूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevrao Mahadik Sugar Factory : आप्पा महाडिकांच्या कर्नाटकातील बेडकिहाळ साखर कारखान्याचा दर ठरला, सरकारने दिलेल्या दरापेक्षा ५० रुपये देणार जादा

Maratha Community: 'मंगळवेढा सकल मराठा समाज आक्रमक'; मनोज जरांगे-पाटील हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा

Karuna Munde: करुणा मुंडेंचा पक्ष निवडणुका लढविणार; संभाजीनगरात दिली माहिती, मराठवाड्यात उभे करणार उमेदवार

US Soldiers: ४०,००० अमेरिकन सैनिक समुद्रात गायब! शास्त्रज्ञ घेत आहेत शोध, नेमकं काय घडलं?

Pratap Sarnaik : मिरा-भाईंदरचा भूखंड नियमानुसारच घेतला; वडेट्टीवारांच्या आरोपांवर परिवहनमंत्र्यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT