Nanded News 
नांदेड

Video-लॉकडाउन : चर्मकारांवर आलीय उपसमारीची वेळ

प्रमोद चौधरी

नांदेड : बारा बलूतेदारांपैकी एक असलेल्या चांभार समाजाची देखील लॉकडाउनमुळे मोठी उपासमार होत आहे. रणरणते ऊन, पाऊस व हवेशी सामना करत रस्त्यावर बसून चपला शिवूनच कुटूंबाचा गाडा त्यांना हाकावा लागतो. मात्र लॉकडाउनमुळे रस्त्यावर बसणेही अवघड झाल्याने कसे जगावे? असा गंभीर प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

रस्त्यावर उन्हा-तान्हात बसून चपला शिवणे, बुटांना पॉलिश करणे हा परंपरागत व्यवसाय आजी सुरु आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्याच्या कडेला छत्रीचा, झाडांचा आधार घेत चांभार कारागीर आपले छोटेसे दुकान थाटून बसलेले असतात. या व्यवसायाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम आम्हाला येत नाही. चपला शिवून, बुट पाॅलिश करूनच मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर कुुटुंबाचा गाडा हाकावा लागत असल्याची खंत चांभार व्यावसायिकांनी केली. 

लॉकडाउनमुळे उपसमारेची वेळ
चांभार समाजातील जवळपास सर्वच कुटुंबियांची उपासमारी लॉकडाउनमुळे होत आहे. ग्रामीण भागात पूर्वी सारखं काम मिळत नसल्याने बारा बलुतेदार समाज कामासाठी शहराकडे वळला आहे. त्यात चांभारर, लोहार, न्हावी, शिंपी, धोबी यासह इतर समाजाने शहरात येऊन आपला पारंपरिक व्यवसाय सुरू केला. पण सध्या जगावर कोरोनाचे भयानक संकट उभे ठाकले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन पाळण्यात येत आहे. पण या लॉकडाउनमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपसमारीची वेळ आली आहे.

नांदेड जिल्ह्यात चांभार समाजाची संख्या मोठी आहे. या समाजाचा उदरनिर्वाह पारंपरिक व्यवसाय चपला, बूट तयार करणे आणि रस्त्यावर बसून चपला शिवणे बूट पॉलिश करून होतो. शहरासह जिल्ह्यात जवळपास दोन हजार कारागीर चांभार व्यवसाय करतात. लॉकडाउनपूर्वी या व्यवसायातून दररोज २५० ते ३०० रुपये मिळायचे. पण लॉकडाउनच्या महिनाभरापासून ७० ते ८० रुपयेही मिळणे अवघड झाल्याची खंत आयटीआय, राज कॉर्नर, छत्रपतीनगर चौकातील चांभार व्यावसायिकांनी व्यक्त केली.    

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर
रस्त्यावर बसून चपला शिवूनच दिवसभराच्या कमाईवर कुटूंबाचा गाडा हाकावा लागतो. याशिवाय मुलांचे शिक्षण आहे. त्यांचे लग्न करणे, पाहुणे-रावळ्यांकडे जाणे-येणे कठीण जाते. शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. किंवा योजनांचा लाभ होत नाही.
- जळबाजी सोनटक्के (चांभार व्यावसायिक,नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT