toor copy.jpg 
नांदेड

लॉकडाऊनमुळे थकले तुरीचे चुकारे

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : शासनाच्या किमान हमी दर (एमएसपी) योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या पंधरा तुर खरेदी केंद्रावर आजपर्यंत सहा हजार ८५७ शेतकऱ्यांची ४० हजार ८७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीच्या २३ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांपैकी आजपर्यंत पाच कोटी ६० लाख ६४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

२५ फेब्रुवारीपासुन खरेदी सुरु
बाजारात तुरीचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. यामुळे शासनाने किमान हमी दरानुसार तुर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात ता. २५ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. 

पंधरा खरेदी केंद्रावर खरेदी सुरु
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहा ठिकाणी खरेदी सुरु आहे. यात नांदेड, मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली व देगलूर येथील खरेदी केंद्राचा समावेश आहे. तर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नायगाव, भोकर व धर्माबाद याठिकाणी तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले. तसेच महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून (महा एफपीसी) सहा ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यात धानोरा (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव), डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार) तसेच मांडवा (ता. किनवट) येथील खरेदी केंद्राचा समावेश आहे. 

६,८५७ शेतकऱ्यांची ४०, ८७५ क्विंटल खरेदी 
तुर खरेदी करण्यासाठी १६ हजार ५३५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आठ हजार २५८ शेतकऱ्यांनी ४० हजार ८७५ क्विंटल माल विक्रीसाठी आणला. यातील सहा हजार ८५७ शेतकऱ्यांची ४० हजार ८७५ क्विंटल तूर खरेदी झाली. 

चोवीस कोटी पैकी पाच कोटी खात्यावर जमा
तुर खरेदी झालेल्या सहा हजार ८५७ शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत दोन हजार १२५ शेतकऱ्यांच्या चार हजार ७५५ क्‍विंटल तुरीचे पाच कोटी ६० लाख ६४ हजार १९२ रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. चाळीस हजार ८७५ क्विंटल तुरीची २३ कोटी ७० लाख ७५ हजार रुपये होतात. यापैकी अद्याप ३६ हजार १२० शेतकऱ्यांचे २० कोटी ९४ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम थकली आहे. यावरुन शेतकऱ्यांचे पैसे थकल्याचे स्पष्ट होत आहे. तुर खरेदी ता. ३० मे पर्यंत होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. एस. पाटील यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT