नांदेड : नागरिकांना पर्यावरण जनजागृतीबाबत अधिक माहिती व्हावी, आपल्या घरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करत परसबागा, गच्चीवरच्या बागा, गार्डन आदी तयार करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी महापालिकेच्या वतीने माझं घर हरित घर उपक्रम राबविण्यात आला. त्याला नांदेडकरांनी प्रतिसाद दिला असून, लवकरच पारितोषिक वितरण होणार असल्याची माहिती महापौर जयश्री पावडे यांनी दिली.
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोक चळवळ उभारावी आणि प्रत्येक कुटुंबाचा यात सहभाग असावा या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून महापालिका आणि वृक्षमित्र फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरात माझं घर हरित घर हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात नांदेड शहरातून ११० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यातील बारा स्पर्धकांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यांना लवकरच पारितोषिके दिली जाणार आहेत.
या भागांत केली पाहणी
परीक्षकांनी महापौर जयश्री पावडे यांच्या उपस्थितीत उदयनगर, कैलास नगर, राजेंद्र नगर, विदूत नगर, एलआयसी ऑफिस समोर, कल्याण नगर, राज कॉर्नर, अंबेकर नगर, सह्याद्री नगर, चैतन्य नगर, विमानतळ रोड, गुरुजी चौक, वामन नगर, बजाज नगर, पूर्णा रोड, भावसार चौक, शिवाजी नगर, अरविंद नगर, चिखलवाडी, वजीराबाद, बोरबन, जुना कौठा, वसरणी, आसर्जन, पदमजा सिटी या भागातील स्पर्धकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पाहणी केली. यातील विजेत्या स्पर्धकांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. या उपकरमामुळे सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरण यासाठीही नागरिकांमध्ये मोठी जनजागृती होणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली आहे.
अशी होती स्पर्धा
स्पर्धेसाठी शास्रशुद्ध पद्धतीने केलेली झाडांची लागवड, निवड, सौंदर्यदृष्टी जोपासत केलेली बागेची रचना, जैविक खते, औषधींचा संतुलीत वापर, भाजीपाला-फळझाडांचा समावेश या बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.परमेश्वर पौळ, प्रा.डॉ. देविकांत देशमुख, संतोष मुगटकर, डॉ. मिर्झा बेग, सतीश कुलकर्णी, शप्रीतम भराडिया, प्रा. डॉ.रमेश चिल्लावार, लता बंदमवार व वंदना गुंजकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.