file Photo 
नांदेड

नांदेड - गुरुवारी कोरोना प्रतिबंधक ‘लसी’चे १७ हजार डोस उपलब्ध होणार 

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना आजाराला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे. नांदेड जिल्ह्यास गुरुवारी (ता. १४) दिवसभरात ही लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्यात एक हजार सातशे वाईल्स मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी बुधवारी (ता. १३) दिली. 

एका वाईल्समध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दहा डोस असतात. त्यामुळे जिल्ह्यासाठी मिळणारी डोसची संख्या १७ हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले. लस उपलब्ध होताच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या शितगृहात ठेवण्यात येणार आहे. 

दिवसाला शंभर किंवा त्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस 

त्यानंतर ही लस जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालय, हदगाव, मुगट आणि नांदेड शहरातील हैदरबाग येथील शासकीय रुग्णालय अशा सहा सेंटरवर पाठविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शासनाच्या संकेत स्थळावर नोंद झालेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. दिवसाला शंभर किंवा त्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना देखील ही लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

या सहा ठिकाणी मिळणार लस 

- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी. 
- श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय 
- देगलूर नाका येथील हैदरबाद रुग्णालय 
- मुखेड उपजिल्हा रुग्णालय 
- हदगाव शासकीय रुग्णालय 
- मुगट शासकीय रुग्णालय 

लसिकरण केंद्राबाहेर खबरदारी घेतली जाणार
कोरोना प्रतिबंधात्मक लस ज्या सेंटरवर उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन लाभार्थ्यास लस दिली जाणार आहे. रसिकरण केंद्राबाहेर गर्दी होणार नाही. याची देखील प्रशासन खबरदारी घेणार आहे. 
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Construction Workers: बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला ५.२५ लाखांपर्यंत मदत; यूपी सरकारची योजना नेमकी काय?

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद

CNG vs EV, TERI Report : ‘सीएनजी’चा पर्यावरणीय भार ‘ईव्ही’पेक्षा कमी ‘टेरी’च्या अहवालातील निष्कर्ष ; कोळशावरील अवंलबित्व कारणीभूत

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ' जागा वाटपाचा निर्णय गुलदस्त्यातच; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुख्यमंत्री दोन दिवसांत देणार निर्णय

Green Energy Corridor Phase 3 : ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ला मंजुरी वीजपुरवठा होणार सुलभ; राज्यांअंतर्गत वितरण प्रणाली मजबूत

SCROLL FOR NEXT