नांदेड

Nanded : हजारो शिक्षकांसाठी काळी दिवाळी

आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन : मराठवाडा शिक्षक संघाचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के अनुदान देवून आपली वेठबिगारी संपवावी म्हणून हजारो शिक्षकांनी दहा ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी (ता.२४) सर्वत्र दीपावलीचा सण साजरा होत असताना, या शिक्षकांची दिवाळी काळीच साजरी होत असल्याने शिक्षकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

राज्यातील इतर घटक आनंदाने दिपोत्सव साजरा करत असताना निसर्गाने शेतकऱ्यांवर तर शासनकर्त्यांनी शिक्षकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार अनुदान द्यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठवाड्यातील आद्य शैक्षणिक चळवळ मराठवाडा शिक्षक संघ सक्रीय सहभागी असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

त्यात म्हटले की, शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली ता.दहा ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. वीस वीस वर्षांपासून या शिक्षकांना विनावेतन किंवा अल्प वेतनावर राबवून घेतले जात आहे. आता माघार घेऊ नये.

सरकार जो पर्यंत प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के अनुदान देत नाही तो पर्यंत माघारी न फिरण्याचा निर्धार शिक्षक समन्वय संघाने केला असून मराठवाडा शिक्षक संघ त्यास तेवढीच तोलामोलाची साथ देत आहे.

काळी दिवाळी साजरी करून सर्वांनी शासनाचा निषेध करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार, रविद्र वाकोडे, सहसचिव रेखा सोळूंके आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT