नांदेड

नांदेड: देशी दारुसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त; विमानतळ पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे

याप्रकरणी पोलिसांनी दारु आणि साडेपाच लाखाची कार जप्त करुन विमानतळ पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरु असल्याने विविध पोलिस ठाण्याचे पथक आपल्या ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी गस्त घालत आहेत. अशाच विमानतळ पोलिसांच्या (Nanded Vimantal police) गस्त दरम्यान महाराणा प्रताप चौक परिसरातून जाणाऱ्या एका कारला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात पाच हजार ७०० रुपयाचा देशी दारु विनापरवाना वाहतूक करताना मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी दारु (Leaqor raid) आणि साडेपाच लाखाची कार जप्त करुन विमानतळ पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव (Api Vijay jadhav) यांच्या पथकाने बुधवारी (ता. पाच) रात्री केली. Nanded: Five and a half lakh items including native liquor seized; Airport police action

याबाबत अधिक माहिती अशी की विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन पोलिस निरीक्षक संजय ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव हे आपले सहकारी हवालदार दारा राठोड, बंडू कलंदर आणि श्री. केंद्रे यांच्या पथकासह शासकिय वाहनातून गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी महाराणा प्रताप चौकात सापळा लावला. ज्या कारमधून देशी दारु वाहतुक होत गोती त्यावर लक्ष ठेवले.

हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्य न्यायालयाने निकाल देत हा कायदा रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

दरम्यान एमएच ३७ जी-५३३९ ही कार आली. पोलिसांनी त्या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण पोलिसांच्या तावडीत सापडल्या जाईल म्हणून चालकांने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने निघाला. यावेळी त्याचा पाठलाग करुन त्याला अडविले. कारची तपासणी केली असता कारमध्ये पाच हजार ७०० रुपयाची देशी दारु आढळली. ही दारु पोलिसांनी जप्त करुन चालकास ताब्यात घेतले. कारसह विमानतळ पोलिस ठआण्यात आणण्यात आले. विजय जाधव यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी रात्री उशिरा चालक मोहन निलाबाई लुट्टे (वय २५) रा. खुशालसिंगनगर, नांदेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT