nanded kandhar road construction work start next five days  esakal
नांदेड

Nanded News : कंधारकरांच्या त्रासाला लागणार पूर्णविराम; मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास

नागरिकांच्या त्रासाला प्रचंड प्रतीक्षेनंतर का होईना पूर्णविराम लागणार असल्याचे चिन्ह

सकाळ वृत्तसेवा

कंधार : गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने रखडत पडलेल्या शहरातील मुख्यरस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. येत्या १५ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली असून हा रस्ता आता मोकळा श्वास घेणार हे निश्चित झाले आहे. खराब रस्त्यामुळे नाकीनऊ आलेल्या नागरिकांच्या त्रासाला प्रचंड प्रतीक्षेनंतर का होईना पूर्णविराम लागणार असल्याचे चिन्ह आहेत.

२०१२ मध्ये राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा मुख्य रस्ता रुंद करण्यासाठी दोन्ही बाजूने असलेली बाजारपेठ जमीनदोस्त करण्यात आली होती.

त्यानंतर खराब झालेल्या रस्त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. पालिकेतील पदाधिकारी एकमेकांचे उणे-दुणे काढण्यातच मश्गुल होते. त्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पुरती अवस्था झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले.

धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच रस्त्यावर तहसील कार्यालय, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे अशी महत्त्वाची शासकीय कार्यालय असल्याने ये-जा करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागायचे.

या रस्त्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अथक प्रयत्न करून नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला. या रकमेत महाराणा प्रताप सिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चौपदरी रस्त्याचे काम होणार आहे.

याशिवाय नाली बांधकाम, फूटपाथ, स्ट्रीट लाईटसह इतर कामे होणार असल्याने नागरिकांत उत्साहाचे वातावरण होते. पालिकेवर सद्या प्रशासक आहे. यामुळे आडवा-आडवी होण्याचा प्रश्नच नव्हता. तरी पण कामाला विलंब होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होत होती. शंका-कुशंका व्यक्त होत होत्या.

शंका केवळ शंकाच ठरल्या

रस्त्याची निविदा झाली. प्रशासकीय मान्यताही अंतिम टप्यात असल्याची माहिती आहे. प्रशासकराज असल्यामुळे आडवा-अडवीचा प्रश्नच नाही. यामुळे येत्या १० ते १५ दिवसात प्रत्यक्षात कामास प्रारंभ होईल असा अंदाज आहे.

गेल्या १० ते ११ वर्षांपासून स्थानिक राजकारण्यांच्या श्रेयवादात या रस्त्याचा प्रश्न लटकत होता. पुलाखालून बराच पाणी वाहून गेल्यानंतर आमदार शिंदे यांना रस्त्यासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात यश आले.

मधल्या काळात निविदेला विलंब होत असल्याने नागरिकांच्या मनात धाकधूक होती. कोणी काडी तर केली नसेल ना ? अशा शंकाही व्यक्त केल्या गेल्या. परंतू त्या शंका केवळ शंकाच ठरल्या असून येत्या १० ते १५ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT