Nanded Lok Sabha 2024 Esakal
नांदेड

Nanded Lok Sabha 2024: नांदेडमध्ये ‘वंचित’ व ‘एमआयएम’ची भूमिका निर्णायक ठरणार; अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसणार?

Nanded Lok Sabha 2024: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ अशी याची ओळख आहे. कॉँग्रेसचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांनी छाप उमटविली मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

Nanded Lok Sabha 2024: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ अशी याची ओळख आहे. कॉँग्रेसचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांनी छाप उमटविली मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर ते लगेच राज्यसभेवर खासदारही झाले आहेत.२०१९ ला विजयी झालेले भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा भाजपतर्फे उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसतर्फे वसंतराव चव्हाण रिंगणात आहेत. ही दुरंगी लढत वाटत असली तरी ‘वंचित’ व ‘एमआयएम’ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच सकल मराठा समाजाचा काय निर्णय होणार? याचीही उत्सुकता असेल.

२०१९ चे चित्र

प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विजयी मते : ४, ८६,८०६

अशोक चव्हाण (काँग्रेस) मते : ४,४६,६५८

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४०,१४८

वर्चस्व

२००४ः भाजप,

२००९ः कॉँग्रेस,

२०१४ः कॉँग्रेस,

२०१९ः भाजप

सद्य:स्थिती

मुस्लिम आणि दलित मतदारांचा कौल अत्यंत महत्वाचा

अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्याने पक्षाला फायदा होईल

मराठा आंदोलनाला जिल्ह्यात मिळालेले यश बघता मराठा समाजाची भूमिका महत्वाची

नवीन युवा मतदाराचा कौल कुणाकडे वळणार हे गुलदस्तात

ओबीसी समाजाकडूनही निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

एकही मोठा उद्योग नसलेला जिल्हा

साखर कारखाने आहेत पण शेतीपूरक उद्योगही महत्वाचे

वाढती बेरोजगारी आणि नोकरी, कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

रेल्वे मार्ग, विद्युतीकरणाचे काम संथगतीने, वंदे भारतची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

SCROLL FOR NEXT