file photo 
नांदेड

नांदेड : प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी मनदीपसिंघ सिलेदार यांची निवड

श्याम जाधव

नांदेड- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी एनसीसीच्या महाराष्ट्र कॉन्टीजनच्या संघामध्ये विष्णुपुरी, नांदेड येथील रहिवासी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेडचा विद्यार्थी मनदीपसिंघ जितेंद्रसिंघ सिलेदार यांची निवड झाली आहे. राज्यातील 26 कॕडेट्स या संघांमध्ये सहभागी असून औरंगाबाद विभागातून पाच कॕडेट्सची निवड झाली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून मनदीपसिंघ सिलेदार हा एकमेव कॕडेट्स आहे. 

राज्यातील सात एनसीसी ग्रुप मधील निवडक ५६ कॕडेट्स गेल्या महिन्याभरापासून पुण्यात निवड चाचणी शिबिरासाठी सहभागी झाले होते. त्यातील केवळ २६ कॅडेट्सची दिल्लीच्या राजपथ संचलनासाठी निवड झाली आहे. हे पथक ता. १८ डिसेंबर रोजी विमानाने दिल्लीला रवाना होणार आहे. 

महाराष्ट्रातील विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात आपले योगदान देत असतात. शिक्षण पूर्ण करीत असतांना हे कार्य करणे म्हणजे एक प्रकारची देश सेवाच आहे. त्यामुळे मनदीपसिंघ सिलेदार यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी मनदीपसिंघ सिलेदार यांची निवड झाल्याबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिवणीकर, एनसीसीचे डॉ. ए. यु. राठोड, डॉ. विठ्ठलसिंह परिहार, युनीवर्सल शाळेचे संचालक जितेंद्रसिंह पहाडिया, संतोष पावडे, गुरुदिपसिंघ चुंगीवाले, दर्शनसिंघ सुखमनी, मुन्नासिंघ कोल्हापूरे, धारोजी हंबर्डे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता इंजि. तानाजी हुस्सेकर, उपअभियंता अरुण धाकडे, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, अॕड. जयसिंग हंबर्डे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले; चांदीही चमकली! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव!

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री, अर्धा डझन मंत्री... नाशिक दौऱ्यावर 'मंत्रिमंडळाची' फौज!

Recharge Plan : फक्त 7 रुपयांत 2GB डेटासह अनलिमिटेड कॉल; 50 दिवस वैधता, 'या' बड्या कंपनीने दिलं सरप्राइज, Jio-Airtel ला मोठा धक्का

Latest Marathi Breaking News Live : ओबीसी आरक्षण धोक्यात; सरकारवर लक्ष्मण हाके यांचा आरोप

'कोणालाच जास्त काळ सहन करायला नको' काजोलचं लग्नाबाबच वक्तव्य चर्चेत, म्हणाली...'लग्नाला एक्सपायरी डेट हवी'

SCROLL FOR NEXT