Corona and omicron Update in Nanded District sakal
नांदेड

Corona Update : नांदेडला मंगळवारी १७० बाधित

४५ झाले बरे; ६६९ जणांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात (Nanded District) मंगळवारी (ता. ११) प्राप्त एक हजार ४०८ अहवालापैकी १७० अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. दिवसभरात ४५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजच्या घडीला ६६९ रुग्ण उपचार घेत असून पाच बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के आहे. (omicron And Corona Update in Nanded District)

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९१ हजार ३१५ एवढी झाली असून यातील ८७ हजार ९९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात ४८, नांदेड ग्रामीण दहा, बिलोली दोन, धर्माबाद पाच, हदगाव आठ, हिमायतनगर दोन, लोहा १५, माहूर दोन, मुदखेड १२, मुखेड दोन, नायगाव एक, उमरी तीन, परभणी चार, वाशीम एक, पुणे एक, बिहारमधील तीन तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात २८, नांदेड ग्रामीण पाच, बिलोली सहा, धर्माबाद एक, देगलूर एक, हदगाव एक, कंधार एक, किनवट पाच, लोहा एक, नायगाव दोन असे एकुण १७० कोरोनाबाधित आढळले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीतील एक, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील ४२, खासगी रुग्णालयातील दोन कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या ६९९ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरीत ३०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये एक, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात १४२, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणात ४८८, खासगी रुग्णालयात आठ जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT