file Photo 
नांदेड

नांदेड - कोरोनामुक्त रुग्णांचा टक्का वाढला; गुरुवारी १७ अहवाल पॉझिटिव्ह

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती व शाळेतील शिक्षकांचे तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता. चार) ५७६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५५४ निगेटिव्ह आले तर १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २२ रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांचे प्रमाण ९५. १८ इतके झाले आहे. 

मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाली आहे. दुसरीकडे तीन दिवसापासून एकाही बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजारी रुग्णांच्या मृत्यूची संख्या ५८६ वर स्थिर आहे. गुरुवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - पाच, नांदेड ग्रामीण - दोन, कंधार - एक, मुखेड- एक, उमरखेड - एक, किनवट - दोन, हदगाव - तीन व हिंगोली दोन असे १७ पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या २२ हजार ६१० इतकी झाली आहे. 

३९६ स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरु

दुसरीकडे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील २१ हजार ५२७ इतकी आहे. त्यामुळे सध्या जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय रुग्णालय व विलगीकरण कक्षात मिळुन २९३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १६ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २२ हजार ६१० 
एकुण कोरोनामुक्त - २१ हजार ५२७ 
एकुण मृत्यू - ५८६ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - १७ 
गुरुवारी कोरोनामुक्त - २२ 
गुरुवारी मृत्यू - शुन्य 
उपचार सुरु - २९३ 
गंभीर - १६ 
स्वॅबतपासणी सुरु - ३९६ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT