नांदेड जिल्हा परिषद 
नांदेड

नांदेड : शिक्षणसेवक पदभरतीची गहाळ संचिका अखेर सापडली

नवीन शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रयत्न आले फळाला : प्रश्न मात्र अनुत्तरीतच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : डिसेंबर २००५ मध्ये झालेल्या शिक्षणसेवक पदभरतीची संचिका एका वर्षापासून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्रशासनाला सापडत नव्हती. शिक्षणाधिकारी, विभागीय उप आयुक्त सुरेश बेदमुथा तसेच राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर (State Director of Education Dinkar Temkar) यांनी चौकशीचे आदेश देऊनही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गंभीर नव्हता. मात्र, नव्यानेच रुजु झालेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी ही संचिका शोधून काढली आहे.

‘आस’ शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने डिसेंबर २००५ मधील शिक्षणसेवक पदभरती संचिकेच्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२० मध्ये ग्राम विकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. त्यानुसार श्री. मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कारवाईचे निर्देश दिले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाला वारंवार सूचना देवून सदर संचिका शोधकार्यात योग्य भूमिका घेतली होती. तरीही, ही संचिका शिक्षण विभागाला सापडत नव्हती. अखेर काही दिवसांपूर्वीच प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेल्या सविता बिरगे यांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संचिकेच्या शोध कार्यात स्वतः लक्ष घातले. अखेर नवीन वर्ष सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ता. ३१ डिसेंबर रोजी ही संचिका जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्याखाली असलेल्या खोली क्रमांक सातमध्ये असलेल्या कपाटामध्ये सापडली.

संचिका तर सापडली, पुढे काय?

शिक्षणसेवक पदभरतीची ‘अ’ दर्जा असलेली ही संचिका कपाटात कोणी ठेवली होती, हे प्रशासनाला वर्षभरापासून माहित नव्हते का? वर्षभरापासून प्रशासनास भूलथाप देणारे अधिकारी, कर्मचारी कोण? संचिका नोंद रजिस्टरला संचिकेचा नंबर नोंदविल्यानंतर सदर संचिका कोणाच्या ताब्यात असायला हवी? या संचिकेबाबत हलगर्जीपणा कोणी केला? असे अनेक प्रश्न आता पडत असून, ते जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?

Telangana Police : दीड कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात माओवादी बंडी प्रकाश पोलिसांना शरण; 45 वर्षांपासून माओवादी संघटनेत होता सक्रिय

'तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा...' अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी सांगितला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...'तेरे नामच्या शुटवेळी...'

IND A vs SA A: रिषभ पंत कर्णधार; रजत पाटीदार, आयुष म्हात्रे Playing XI मध्ये! उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ

Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वर खून प्रकरणाला नवे वळण! गुराख्याच्या अटकेनंतरही नातलगांचा पोलिसांवर संशय; बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरुद्ध तक्रार

SCROLL FOR NEXT