nanded news esakal
नांदेड

Nanded : श्री सुभाष कारखान्याने केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड

प्रती टन शंभर रुपये केले खात्यात जमा : शेतकऱ्यांत आनंददायी वातावरण

सकाळ डिजिटल टीम

हदगाव : श्री सुभाष साखर कारखाना व शिऊर साखर कारखान्याचे संचालक श्री सुभाषराव लालासाहेब देशमुख व सुशीलकुमार सुभाषराव देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे आश्वासनांची पूर्तता केली असून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रती टन शंभर रुपये जमा केले आहेत.

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण दोन कोटी आठ लक्ष ४२ हजार ३५१ रुपये जमा करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या संचालक मंडळाचे आभारही व्यक्त केले आहेत.

हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव, कळमनुरी व हिंगोली असे कार्यक्षेत्र असलेल्या श्री सुभाष साखर कारखाना व शिऊर साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांचे एकूण २ हजार ८७५ सभासद खातेदार संख्या असून जवळपास सर्वच ऊस उत्पादक सभासद खातेदारांच्या खात्यावर प्रती टन शंभर रुपयाप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली असल्याचे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक एस. वाय. बारसे यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.

श्री सुभाष साखर कारखाना व शिऊर साखर कारखाना हे दोन्ही कारखाने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कामधेनू’ असून या दोन्ही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या-ज्या वेळी जो शब्द दिला तो शब्द कारखान्याचे चेअरमन सुशीलकुमार देशमुख यांनी पाळला असल्याच्या प्रतिक्रिया कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यानिमित्ताने बोलून दाखविल्या.

प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती वेळोवेळी जो काही आदर भाव ठेवला त्या सर्व बाबींची जाणीव ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहील अशा प्रकारच्या भावनाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यानिमित्ताने बोलून दाखविल्या. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वांनाच आपली दिवाळी गोड व्हावी, लेकी बाळींना साडी-चोळी व्हावी, घरामध्ये गोडधोड व्हावे अशी आशा असते. त्याकरीता आपण वर्षभर शेतामध्ये पिकविलेल्या ऊसाचे पैसे वेळेवर मिळावे अशी अपेक्षा, आशा प्रत्येक शेतकऱ्यांना असतेच.

ऊस उत्पादक शेतकरी हाच सर्वस्व : देशमुख

श्री सुभाष साखर कारखाना व शिऊर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधव हेच आमच्यासाठी सर्वस्व असून आम्ही ज्या-ज्या वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी काही हमी, आश्वासने दिलीत ती आम्ही वेळोवेळी पूर्ण करण्याबाबत कटिबद्ध राहतच आलो आहोत आणि याहीपुढे राहू. ऊस उत्पादक शेतकरी बांधव व आमच्यासाठी कार्यक्षेत्रातील या दोन्हीही कामधेनू आमच्यासाठी दैवतच आहेत.

याची आम्हास पूर्णतः जाणीव असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने तत्काळ ही रक्कम जमा करण्यात आली असे सांगत असतांनाच सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार, कामगार व सर्व कर्मचारी बांधवांना दोन्ही कारखाना प्रशासनाचे चेअरमन श्री सुभाषराव देशमुख व श्री सुशीलकुमार देशमुख यांनी यानिमित्ताने दीपावलीच्या शुभेच्छा देत असतांनाच ही दीपावली सर्वांनाच आनंदाची व भरभराटीची जावो असे याप्रसंगी बोलतांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT