file photo 
नांदेड

नांदेडमध्ये तलवारीने हल्ला, तिघेजण गंभीर...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कपडे खरेदीसाठी घेतलेले पाच हजार रुपये वेळेत का दिले नाही म्हणून एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यावेळी आरोपींने त्याच्या मित्रांवर पिस्तुल रोखून दोघांना गंभीर जखमी केले. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. पाच) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. तिन्ही जखमीवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शहराच्या छत्रपती पुतळ्याच्या बाजूला असलेल्या वाडेकर हॉस्पीटलच्या मागे राहणारा मंगेश सम्राट यादव (वय २८) याने कपडे खरेदीसाठी गल्लीतील रवी नंदलाल यादव याच्याकडून पाच हजार रुपये हातउसने घेतले होते. परंतु लॉकडाउनच्या काळात त्याच्या हाताला काम नसल्याने तो घेतलेले पाच हजार रुपये वेळेत परत करु शकत नव्हता. त्याला दरम्यानच्या काळात रवी यादव याने पैशाची मागणी केली होती.

हेही वाचासप्तरंग’ची काव्यपौर्णिमा यंदा प्रथमच झाली आॅनलाइन
 
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राडा

शुक्रवारी (ता. पाच) रवी यादव याने संगनमत करून आपले मित्र नमो भगत उर्फ यादव, अक्षय यादव आणि इतर पाच ते सहा जण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगेश यादवला अद्दल घडविण्यासाठी दबा धरुन बसले होते. रात्री साडेसातच्या सुमारास मंगेश यादव हा घरातून बाहेर आला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे तीन मित्र होते. रवी यादव याने त्याला अडविले. त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या गळ्यावर तलवार मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा वाद सोडविण्यासाठी पुढे आलेले स्वाभिमान पवन यादव आणि विनोद पापालाल यादव या दोघांनाही लाखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी आरोपीपैकी एकाने मंगेश यादव याच्यावर पिस्तुल रोखून धरले. 

मंगेश यादवसह तिनजण गंभीर

जखमी व आरोपीं एकाच गल्लीतील असल्याने त्यांचे नातेवाईक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीमध्ये मंगेशच्या मानेला, स्वाभिमानच्या पाठीला तर विनोद यादवच्या डाव्या दंडाला जबर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांनी भेट दिली. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर जखमी मंगेश यादव याच्या फिर्यादीवरुन रवी नंदलाल यादव, अभय यादव व त्यांच्या सहा मित्रांवर संगनमताने प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायदा व अग्निश्‍स्त्राचा गैरवापर करणे या कलमान्वये वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे करत आहेत.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT