File photo 
नांदेड

नांदेड : आधार नोंदणीनुसारच विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली जाणार

प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत शाळा कधी सुरु होणार याबाबत अनिश्चितता असताना सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. विशेष म्हणजे आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य धरण्यात येणार असल्याने शाळांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा मार्चपासून बंदच आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले; मात्र विद्यार्थीच शाळेत यायल तयार नसल्याने शाळा ओस पडल्या आहेत. शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु केले. पण पहिली ते आठवीच्या वर्गांना अद्यापही परवानगी दिलेली नाही.  राज्यातील शाळा प्रत्यक्षात कधी सुरु होणार याबाबत अद्यापही निर्णय जाहीर झालेला नाही. अजूनही अनेक विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संपर्क होऊ शकलेला नाही. राज्यात सर्व ठिकाणी प्रत्यक्षात शाळा उघडल्या नसताना शिक्षण विभागाने मात्र शंभर टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बंधनकारक केली असल्यामुळे शिक्षक मोठ्या अडचणीत सापडले आहे.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली होती. मात्र त्यावेळी अनेक शाळा नोंदणीचे काम करु शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता मार्च अखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करम्याची तंबी शिक्षण विभागाने दिलेली आहे. परंतु, शाळा सुरु झाल्यावरही लगेच विद्यार्थी येतील का? ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, त्यांचे आधार पत्रक नाही, त्यांचे आधार पत्रक काढण्यासाठी शिबिरे कशी घ्यायची? असे प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत.

होणार काय
मार्च अखेरपर्यंत सरल प्रणालीवर आधार क्रमांक नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनाच ग्राह्य धरून विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची पदे निश्चित करण्यात येणार आहेत.

शाळांची धावपळ
ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांच्यासाठी आधार नोंदणी कार्यक्रम करण्यात यावा, अशीही सूचना शिक्षण विभागाने दिलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु होताच विद्यार्थ्यांचे आधार पत्रक काढण्यासाठी शाळांना धावपळ करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT