file photo
file photo 
नांदेड

शाळा सुरू करण्यास अधिकाऱ्यांची नकारघंटा

नवनाथ येवले

नांदेड ः कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. खबरदारीच्या उपाय योजनांसह सोशल डिस्टन्स हाच कोरोनावर प्रभावी उपाय आहे. त्यामुळे यंदा शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरुन अद्याप स्पष्ट आदेश नसले तरी प्रचलित नियमानुसार (ता.१५) जूनपासून शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभुमीवर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी शुक्रवारी जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचे अभिप्राय जाणुन घेतले. 

कोराना महामारीची संक्रमण साखळी खंडीत करण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लॉकडाउन कालावधीत दीड महिना अगोदर शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. दरम्यान पुर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसह माध्यमिकच्या काही वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर महाविद्यालयीन परीक्षेतून काही वर्गांना सुट देण्यात आली. 

लॉकडाउनमुळे प्रचलित नियमानुसार (ता.१५) जूनला शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरुन अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना विषयी सद्यस्थितीसह शाळा सुरू करण्यासाठी धोरनात्मक निर्नयासाठी स्थानिक पातळीवरुन आढावा घेण्यात येत आहे.  शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर यांनी आढावा बैठकीद्वारे जिल्हाभरातील गटशिक्षणाकिधाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. 

हे ही वाचाविद्यार्थी गिरवत आहेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे, कुठे ते वाचा... ​
 
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना बरोबर सोशल डिस्टन्स हा पर्याय लक्षात घेता ग्रामीण भागमध्ये महानगरातून अनेक नागरिक गावी परतले आहेत. त्या नागरिकांना गावच्या शाळेत क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. शिवाय शाळेत विद्यार्थी- शिक्षकांचा संपर्कामुळे सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी शक्य नसल्याने तुर्तास शाळा सुरू करण्यास संमत नसल्याच्या भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या. गावी परतलेल्या नागरिकांमुळे सध्या ग्रामीण भागातून कोरोना बाधित रुग्ण समोर येत असल्याने शाळा सुरू करणे जोखिम ठरणार असल्याचे मत उपस्थितांतून व्यक्त करण्यात आले. 

शासनस्तरावरुन शाळा सुरू करण्याबाबत स्पष्ट निर्देश नसले तरी स्थानिक पातळीवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइनला प्राधन्य देत उपक्रम राबविण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी केले. दरम्यान, पुणे - मुंबई येथून गावी पतरलेल्या नागरिकांना शाळेत क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या शाळांची माहिती त्यांनी घेतली. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरुन वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश त्यांनी जारी केले. 

येथे क्लिक करातंबाखू सेवन किती धोकादायक.......यासाठी वाचाच
 
बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या भावना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामार्फत शासनाला कळवण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर म्हणाले. या वेळी गट शिक्षणाधिकारी माधव सलगर, आर.एल. आडे, गंगाधर राठोड, सुधीर गुट्टे, संजय येरमे, रविंद्र सोनटक्के, राम भारती, राजकुमार जाधवर, हमीद दौलताबादी, लता कोठेकर, एल. एम. गोडबोले, डी. एम. मठपती, जी.एफ.सोनटक्के, आर.एल. ससाणे, एम.वाय. वानोळे, एस.टी. पवणे व आर. एम. रोटे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT