Nanded News 
नांदेड

Video - रमजान ईद काही तासांवर, तरीही ग्राहकांची प्रतिक्षाच

प्रमोद चौधरी

नांदेड : रमजान महिन्यात ड्रायफ्रुटची दहापटीने अधिक विक्री असते. मात्र, कोरोनात लाॅकडाउनमुळे ड्रायफ्रुटची दुकाने दोन महिन्यांपासून बंदच होती. पेंडखजुरचे शंभरावर बाॅक्स पडून होते. विक्री करणार कसे? असा व्यावसयिकांचा प्रश्न आहे. ड्रायफ्रुट आणि मसाल्याचा सिझन हातातून जातो की काय? अशी भीती होती. त्यामुळे यंदा रमजान ईद काही तासांवर आली असतानाही ग्राहक कमी असल्याचे चित्र आहे. 

ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद म्हटलं की शिरखुर्मा आला. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या घरात शिरखुर्मा हमखास असतोच. शिरखुर्मासाठी रमजानच्या शेवटच्या दहा पंधरा दिवसात खरेदी केली जाते. मात्र, यंदा लाॅकडाउनमुळे संपुर्ण रमजान महिना आणि ईद उल फित्रही घरातच राहणार आहे. त्यातच काहीच कामधंदा नसल्याने पैशांची चणचण भासत असल्यामुळे लोकांची खरेदी करण्याचीही आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे याचा मोठा फटका ड्रायफ्रुट आणि मसाले विक्री करणाऱ्यांना बसत आहे.  

वर्षातील महत्त्वाची चार सिझन हातातून गेले
ड्रायफ्रुट आणि मसाले विक्रेत्यांना महत्त्वाचे चार सिझन मिळतात. यामध्ये लग्न सराई, विविध उत्सव, हिवाळा तसेच रमजान असे महत्त्वाचे त्यांचे चार सिझन असतात. या सिझनमध्ये मोठी उलाढाल होत असते. मात्र हे सर्व काही लाॅकडाउनमध्ये गेले आहे. रमजान महिन्यात अनेक पटीने पेंडखजुर, ड्रायफ्रुटची विक्री होत असते. मात्र सगळ्यांचा माल दुकानातच पडून असून, तो विक्री कसा करावा? असा प्रश्‍न आता विक्रेत्यांना सतावत आहे.  

ड्रायफ्रुटच्या दरात वाढ नाही
लॉकडाउनमुळे दुकानादारांचे ड्रायफुट विक्री झालेली नाही. काही जणांनी रमजानच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रकारचे पेंडखजुर मागविले होते, मात्र ते सुद्धा पुर्णपणे विक्री झालेले नाही. अशाही स्थितीत शिरखुर्मासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुटच्या दरात वाढ झालेली नाही. सध्या बदाम ८०० ते एक हजार, काजू ८०० ते एक हजार २००, पिस्ता एक हजार ६०० ते दोन हजार, खोबरा १५० ते १८०, मनुके ३० ते ५०० रुपये किलो असा दर आहे. तर शेवयांचा १०० ते २०० रुपये असा दर आहे.
 

बाजारात सध्या विविध प्रकारचे पेंडखजुर आहेत. रमजाननंतर ते विक्री करणे शक्य नाहीच. लाॅकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे ग्राहकांची संख्या यंदा मंदावली आहे. त्यामुळे माल विक्री करताना अनेक अडचणी येत आहेत.
- शेख आय्युब (ड्रायफ्रुट विक्रेते)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT