Re election will be held in five villages in ardhapur taluka
Re election will be held in five villages in ardhapur taluka 
नांदेड

अर्धापुरात पाच गावात पुन्हा होणार निवडणूक; प्रशासन लागले कामाला

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (नांदेड) : तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा कमी होत असताना पाच गावात पुन्हा निवडणूक होणार आहे. तालुक्यातील रोडगी, आमरबाद तांडा, आमराबाद, शैलगाव खुर्द, देळूब खुर्द या गावातील १५ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तर मालेगाव पंचायत समितीच्या गटातही पोटनिवडणूक होणार असून प्रशासन कामाला लागले आहे.

अर्धापूर तालुक्यात 43 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे. निवडणुक झालेल्या पाच गावात पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पाच गावात आरक्षित जागेवर उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.

रोडगी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक, दोन, तीनमध्ये अनुक्रमे अनुसूचित जाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिक मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातील उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. तर आमराबाद तांडा येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व तीनमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातील उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. आमराबाद येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व तीन मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या तीन जागा रिक्त आहेत. शैलगाव खुर्दमध्ये प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. तर देळूब खुर्दमध्ये प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला प्रवर्ग या दोन जागा रिक्त आहेत.

या पाच गावात या प्रवर्गातील काही बोटावर मोजण्याइतके घरे आहेत. त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाहीत तर काही गावत दबाव येत असल्यामुळे येथील नागरिक निवडणुकीपासून दूरच राहतात. सरपंचपदांचे आरक्षण सुटूनसुध्दा पद रिक्त राहिल्याच्या घटना झाल्या आहेत. अशा गावात उपसरपंचांनी कारभार पाहिला आहे. या पाच गावातील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रभाग निहाय प्रारूप यादी प्रसिद्ध करणे, या यादीवर हरकती व सूचना दाखल करणे व प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिद्ध करणे. या निवडणुका ११ ते २० फेब्रुवारी या काळात होणार आहे .

भाजपाचे माजी सभापती डॉ. लक्ष्मण इंगोले हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते मालेगाव गटातून अपक्ष म्हणून निवडूण आले होते. त्यांनी राजीनामा दिल्याने मालेगाव गटात पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT