NND09KJP01.jpg
NND09KJP01.jpg 
नांदेड

‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ काय आहे उपकृम ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मासिक पाळी हा जरी नैसर्गिक संक्रमणाचा काळ असला तरी त्या काळातील स्वच्छता, पोषक आहार आणि आरोग्याविषयी घावयाच्या काळजीचा अभाव आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षण पद्धतीत अंतर्भूत नसलेल्या आणि लज्जेची बाब समजून उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक बाबीला उघडपणे बोलणे हि काळाची गरज आहे. आणि याच उद्देशाने महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर सातत्त्याने मराठवाड्यात काम करत असलेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या महिला स्वयंरोजगार कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २५० गावातील महिलांना लाभ
महिला व मुलींच्या आरोग्यासाठी पूरक अशा उच्च दर्जाच्या सॅनेटरी पॅडचा निर्मिती प्रकल्प शुभंकरोती फाऊंडेशन तर्फे देसाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आला आहे. ना नफा ना तोटा या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २५० गावातील महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, पोषक आहार, आरोग्याविषयी घावयाच्या काळजी आणि ग्रामीण भागात आज उपलब्ध नसलेल्या उच्च दर्जाच्या सॅनेटरी पॅडचा महिला स्वयंरोजगारांमार्फत पुरवठा ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या उपक्रमांतर्गत केला जात आहे. आणि याचाच भाग म्हणून कोरोना संक्रमणामुळे रोजगार बुडालेला महिलांना या अडचणीच्या काळातही मासिक पाळीतील स्वच्छता ठेवण्यासाठी लक्ष्मीपती महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सॅनेटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

शिक्षित करून स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल
अपुरी जागा, वाढत्या धावपळीमुळे वेळेचा आणि स्वछतेचा अभाव, मासिक पाळीभोवती असलेला लज्जा आणि न बोलण्याचा विळखा ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत सगळीकडेच कायम असल्याने त्याबाबतची स्वच्छता फारशी पाळली जात नाही त्यामुळे ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे' हा उपक्रम केवळ सॅनेटरी पॅड उपलब्धता यापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील महिला व मुलींना मासिक पाळीचे संपूर्ण नियोजन जसे, मासिक पाळीची नैसर्गिक प्रक्रिया, मासिक पाळीतील स्वच्छता, अस्वछतेमुळे होणारे जंतूसंसर्ग, आवश्यक आहार आणि व्यायाम याबाबत शिक्षित करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेने घेऊन जाणे या मुख्य उद्देशावर सुरु करण्यात आला आहे.

अल्प दरात उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड उपलब्ध
यावेळी शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी व संस्थेच्या प्रकल्प सहाय्यक रोहिणी वाघमारे, बचत गटाच्या अध्यक्ष नीता जोशी यांच्या हस्ते महिला सॅनेटरी पॅड वाटप करण्यात आले. लक्ष्मीपती महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अल्प दरात उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी बचत गटाच्या अध्यक्ष नीता जोशी, सुनीता पवार, आशा दवे, अश्विनी देशमुख, अनिता रापते, स्नेहा पवार, संगिता तिडके, मोनिका तिडके, विद्या पवार, योजना पवार, सविता पांचाळ, उज्वला शिंदे, योगिता कंडाळकर, चंद्रकला गुडमलवार, नीता घाटोळ, मीना पवार व प्रतिभा पवार या सर्व महिला परिश्रम घेत आहेत.    

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT