rabbi crop sakal
नांदेड

नांदेड : रब्बीमध्ये यंदा विक्रमी पेरणी

तीन लाख ३५ हजार हेक्टरवर पेरा : अडीच लाख हेक्टरवर हरभरा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षाच्या तुलनेत रब्बीची (Rabbi)पेरणीही विक्रमी क्षेत्रावर झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या २४० टक्क्यांनुसार तीन लाख ३५ हजार ७८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर हरभऱ्याचा समावेश आहे. यंदाची रब्बीतील पेरणी मागील काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधीक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा वार्षीक सरासरीपेक्षा १३६ टक्के पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापूरी बंधारे, उच्च पातळी बंधारे शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. परिणामी जमिनीतील जलस्त्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले होते. यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या होत्या. यानुसार केलेल्या नियोजनामुळे यंदा जिल्ह्यात रब्बीमध्ये विक्रमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या २४० टक्क्यांनुसार तीन लाख ३५ हजार ७८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर हरभऱ्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८८ हजार ३५ हेक्टर असताना दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यासोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र १८ हजार ४६३ हेक्टर असताना आतापर्यंत ३० हजार ८०५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीक्षेत्र २६ हजार ९५१ हेक्टर आहे. यंदाची रब्बीतील पेरणी मागील काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधीक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

यंदा पावसाचे प्रमाण वार्षीक सरासरीपेक्षा अधीक झाल्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी क्षेत्रावर पेरणी झाली. यात शेतकर्‍यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले. उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीन बिजोत्पादनाला प्राधान्य देवून सोयाबीन बियाणांची गरज घरच्या बियाणांतून भागवावी.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड.

पेरणी झालेले क्षेत्र

(हेक्टरमध्ये)

हरभरा

दोन लाख ६७ हजार ५७६

गहू

३० हजार ८०५

रब्बी ज्वारी

२७ हजार १४०

रब्बी मका

पाच हजार ४३८

करडई

तीन हजार ३१९

एकूण

तीन लाख ३५ हजार

७८६ हेक्टर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षांचे 'फायनल' वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून परीक्षा सुरू

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांमध्ये अश्रू; ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर भावुक

Kolhapur Faermers : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण आल्यास कठोर कारवाईचा शिरोळ पोलिसांचा इशारा

Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव

Latest Marathi News Live Update : धाराशिवच्या ₹140 कोटींच्या कामावरून महायुतीत वादाचा भडका

SCROLL FOR NEXT