नांदेड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पदाधिकारी व संचालकांच्या वतीने पद्मश्री शामराव कदम यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मंगळवारी सभा घेण्यात आली.  
नांदेड

कलंबर कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा जिल्हा बॅंकेत ठराव 

अभय कुळकजाईकर

नांदेड - मागील तीन वर्षापासून रखडेलली कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना विक्री करण्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी तसेच सहकार महर्षी पद्मश्री शामराव कदम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ता. १५ ते ता. २० आॅक्टोंबर दरम्यान बॅंकेच्या वतीने जिल्ह्यात दरवर्षी सहकार सप्ताह साजरा करण्यात यावा, असा निर्णय नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मंगळवारी (ता. २०) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मागील सहा महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची बैठक कोरोना संसर्गामुळे झाली नव्हती. मंगळवारी पद्मश्री श्यामराव कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, मोहन पाटील टाकळीकर, लक्ष्मण ठक्करवाड, दिलीप कंदकुर्ते, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, गयाबाई चव्हाण, जिजाबाई जगदंबे, सुशांत चव्हाण, जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम आदींची उपस्थिती होती. 

पद्मश्री शामराव कदम यांच्या पुतळ्यास अभिवादन
सुरवातीला पद्मश्री शामराव कदम यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खासदार चिखलीकर यांनी पद्मश्रींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दरवर्षी बॅंकेतर्फे सहकार सप्ताह साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास माजी खासदार खतगावकर यांनी अनुमोदन दिले. विषय पत्रिकेवरील एकूण २८ विषयांवर तसेच फिरत्या सभेत पास झालेल्या विषयांवर चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या विषयावरही चर्चा झाली. 

बॅंकेला सहा कोटी ८० लाख रुपयांचा निव्वळ नफा  
बॅंकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकूण ८८९ कोटी रुपयांचे विविध पेमेंट करून जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल व त्यांच्या परिश्रमातून बॅंकेस मार्च २०२० अखेर सहा कोटी ८० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या हक्काच्या प्रलंबित चार वेतनावाढीपैकी दोन वेतनवाढी आणि महागाई भत्त्याच्या मर्यादेमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावीपणे डिजीटल बॅंकिंग करण्याच्या अनुषंगाने चार लाख डेबीट कार्ड देण्याचीही निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी अध्यक्षीय समारोप केला तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कदम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT