Dharmabad to Karegaon Road News 
नांदेड

धर्माबाद : साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतून प्रवास करायचा?

कारेगाव ते धर्माबाद या रस्त्यावरील बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले : वाहनचालकांतून संताप

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद : धर्माबाद ते कारेगाव (Dharmabad to Karegaon) या मार्गाचे खड्डयांमुळे चाळण झाली आहे. धर्माबाद ते कारेगाव २२ किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यावर सतराशे साठ खड्डे असल्याने प्रवास करणाऱ्यांच्या हाडाचा व वाहनांचा (Bone and vehicle cramp) खुळखुळा होत आहे.

तात्पुरते रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र ते पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. साहेब, अजून किती दिवस खड्डयांतून प्रवास करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धर्माबाद ते कारेगाव या मार्गाचा नांदेडला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग केला जातो. तसेच कारेगाव, जारीकोट, चोळाखा या परिसरातील नागरिकांना कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी नेहमीच या रस्त्यावरून यावे लागते.

या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. धर्माबाद ते मंगनाळी फाटा, पाटोदा ते कारेगाव या अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता याचा ताळमेळ लागत नाही.

या खराब रस्त्यावर सतराशे साठ खड्डे असल्याचे विचित्र स्थिती दिसून येत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात लहान - मोठे अपघात होत आहेत. प्रवाशांच्या हाडांचा व वाहनांचा खुळखुळा होत आहे. वाहनांचे नुकसान व चाकाची झीज होत आहे.

याचा प्रवाशांना महिनोंमहिने त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डयांवर तात्पुरती मल्लमपट्टी करण्यात आली होती. ती पण थातुरमातुर पध्दतीने. बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे.

हायवे राहू द्या, तूर्त सुखरूप जाऊ द्या

नांदेड पासून ते धर्माबाद येथील तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत बासर रस्ता शंभर किलोमीटर आहे. सदरील रस्ता हायवे सीसी करण्यासाठी १३५० कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याचे गतवर्षी धर्माबाद येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले होते.

या १०० किलोमीटरच्या रस्त्यावर कारेगाव ते धर्माबाद मार्ग येतो. या रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. या रस्त्याचे काम होईल तेंव्हा होईल किमान सध्या सुखरूप प्रवास होईल, असा साधा रस्ताही खड्डेमुक्त तयार करून द्यावा, अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, दिगांबर पाटील कदम चोंडीकर यांच्यासह वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.(Nanded News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT