नांदेड : समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखविणारा ‘साईप्रसाद परिवार’. कोरोनाच्या संकटकाळातही परिवारातील सर्व सदस्यांनी कुठलाहा गाजावाजा न करता सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. नियमित सेवेसोबतच अन्न-धान्य किट, मोफत जेवण आदींसोबतच वधू-वरांच्या लग्नासाठी आवश्यक साहित्यांचेही ‘साईप्रसाद’च्या ‘नाथां’नी निःस्वार्थपणे वाटप केले.
मागील सहा वर्षांपासून साईप्रसाद समाजातील गरजवंद कुटुंबासाठी विवाह मेळाव्याचे आयोजन करत आहे. साईप्रसादच्या वतीने सहा वर्षात २९० विवाह लावून दिले आहे. अनाथ, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहीद जवान व अत्यंत गरीब कुटुंबातील पाल्य यांचे विवाह साईप्रसादच्या वतीने लावून दिले जातात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजे एप्रिल २०२० मध्ये ५१ जोडप्यांच्या सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन साईप्रसादच्या वतीने करण्यात आले होते. परंतु, संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या भिषण अशा कोरोना आजाराचा महाराष्ट्रातही झपाट्याने प्रसार व्हायला सुरुवात झाली. यामुळे पुर्वनियोजित सामुहिक विवाह मेळावा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला होता.
हे देखील वाचाच - योगदिनी आमदारांनी पहाटेच केले गुलाबपुष्पांनी स्वागत
करोना आटोक्यात आल्यास हा विवाह मेळावा आयोजित करता येईल असे वाटत होते. याच आशेवर गरजवंत कुटुंबांनीही विवाह पुढे ढकलले. कोरोना आजाराची वाढती भिषणता व संकट लक्षात घेता साईप्रसादला विवाह मेळावाच रद्द करावा लागला. त्यामुळे सर्व वधु-वर पित्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांना ही भिती भेडसावत होती की, आता या कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटात आपल्या मुलींचे विवाह कसे लावणार. कारण पहिलीच घरची परिस्थिती बेताची त्यामुळे साईप्रसादच्या सामुहिक विवाह मेळाव्यात नोंदणी केल्याने त्यांना दिलासा भेटला होता. परंतु, कोरोनामुळे विवाह मेळावा रद्द झाल्याने ते सर्व अधिकच हतबल झाले होते. त्यांची ही दयनीय परिस्थिती ‘साईप्रसाद’च्या दात्यांच्या लक्षात आली व यासर्व परिवारांना आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथे क्लिक कराच - Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच
भिषण अशा या संकटकाळात साईप्रसाद परिवारातील मंडळींनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साईप्रसादकडे विवाहासाठी नोंदणी केलेल्या ५१ जोडप्यांना विवाह साहित्य देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय प्रत्येक जोडप्यास विवाहाप्रसंगी येणाऱ्या इतर खर्चासाठी सात हजार १०० रुपयेही देण्याचे ठरले. विवाह साहित्यामध्ये संसारोपयोगी सर्व भांडी, नवरी-नवरदेवासाठी साडी व सफारी, मनीमंगळसुत्र, जोडवे, इरोद्या, चप्पल, बुट, सतरपंज इत्यादी सर्व साहित्य देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग व कोरोना संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने दररोज पाच ते सात जोडप्यांना बोलावून हे वाटप करण्यात सर्वांना करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.