saloon sakal
नांदेड

Crime: नांदेड हादरलं! दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खून अन् आरोपीही ठार

सध्या या प्रकरणाने नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशात गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली. दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा आणि सलून मालकाचा वाद पेटला आणि वादात सलून चालकाने चक्क 22 वर्षीय तरुणाची (ग्राहक) हत्या केली. थरकाप उडवणारा हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुढे काही संतप्त अज्ञात लोकांनी हत्या केल्याच्या रागातून सलून विक्रेत्याचाही खून केला. सध्या या प्रकरणाने नांदेडसह संपुर्ण महाराष्ट्र हादरलाय. (salon owner killed customer in nanded murder case goes viral)

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि विशेषत: हत्येचे प्रमाण वाढत आहे. अशात नांदेड येथील या घटनेने पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले. जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बोधडी येथे हा प्रकार घडलाय. व्यंकटी सुरेश देवकर असे मृतक तरुणाचे नाव असून अनिल शिंदे असे मृतक सलून चाकलाचे नाव आहे.

व्यंकटी सुरेश देवकर हा गुरुवारी संध्याकाळी दाढी करायला सलूनमध्ये गेला. पैशाच्या कारणावरुन सलून चालक आणि त्याच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अखेर संतापलेल्या सलून चालकाने दाढी करण्यासाठी वापरला जाणाऱ्या शस्त्राने व्यंकटी याचा गळा कापला. त्यानंतर सलून चालक पळून गेला. मात्र अज्ञात जमावाने सलुन चालकाला शोधलं आणि त्याला ठार मारले. मार्केटमध्ये असलेली सलून दुकानही पेटवली. या घटनेने बोधडी येथे तणावाचे वातावरण पसरले होते.

एकाच दिवशी झालेल्या या दोन हत्याकांडाने नांदेड हादरले पण अशा घटनांमुळे पोलिसांचे भय उरले नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT