Sanjay Biyani Esakal
नांदेड

संजय बियाणी हत्येनंतर पत्र पाठवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वैयक्तिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाठवले पत्र

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेड (Nanded) येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर घरी निनावी पत्र (Letter) पाठवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. धर्माबाद येथील आटाळा येथून ७४ वर्षीय विठ्ठल सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिस विभागाकडून विविध यंत्रणेमार्फत तपास सुरु असताना विठ्ठल सूर्यवंशी याच्याविषयी सुगाव लागला. सूर्यवंशीचा गावातील पांडुरंग येवले या व्यक्तीशी शेतीच्या कारणावरुन वाद होता. येवले यांना गुन्हात अडकवण्यासाठी खोडसाळपणाने पत्र पाठवल्याची कबुली सूर्यवंशीने दिल्याचं समोर आलं आहे. तसेच या पत्रातून बियाणींना जीवे मारण्याचा प्लॅन परभणीत झाल्याचा दावा करण्यात आला होता. हे निनावी पत्र स्पीड पोस्टने आलं होतं, तर पत्रात लिहिलेला मजकूर हिंदी भाषेत होता. या पत्रात रेती माफियाचाही उल्लेख करण्यात आला होता.

काय होतं पत्र?

बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी आया था…. जिसेने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते… अशा आशयाचे निनावी पत्र संजय बियाणी यांच्या घरी स्पीड पोस्टने आले होते.

नेमक काय प्रकरण

नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिलला भरदिवसा त्यांच्या राहत्या घराजवळच काही अज्ञात गुंडांनी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT