file photo 
नांदेड

राष्ट्रीय महामार्ग आष्टा, पैनगंगा नदी ते राणी धानोरा इजिमा'ला राज्यमार्गाचा दर्जा- आमदार भीमराव केराम 

साजीद खान

माहूर (जि. नांदेड) :  माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून आष्टा, पैनगंगा नदीपासून यवतमाळ जिल्ह्यातील राणी धानोरा,अंजनखेड ते लोनबेहेळपर्यंतच्या इतर जिल्हा मार्गाला शासनाने गुरुवारी  (ता. २१) रोजी शासन निर्णयानुसार रस्ते विकास आराखड्यामध्ये समावेश करून या पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता दर्जोन्नत होणार आहे. हा रस्ता राजमार्ग म्हणून समावेशित व्हावा यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मार्गामुळे विदर्भ- मराठवाडा जोडला जाईल शिवाय हा रस्ता वीस किलोमीटर परिसरातील एकमेव पैनगंगा नदी ओलांडून दोन्ही प्रदेशांना जोडणारा रस्ता ठरेल.

माहूरगड हे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मुख्य पीठ आहे. तसेच माहूर तालुका हा आदिवासी अती दुर्गम, डोंगराळ भागात वसलेला आहे.यवतमाळ व नांदेड जिल्ह्या ला जोडण्यासाठी सध्यास्थितीत पैनगंगा नदीवरील धनोडा पुल व तेलंगणा सीमेजवळील पैनगंगा नदीवर उनकेश्वर स्थित पुल हे दोन रस्ते उपलब्ध आहे. जे की ५५ किलोमीटर अंतरावर आहे. धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग १६१ अ पासून जवळ पडसा येथे पैनगंगा नदीवर पुलाचे काम प्रगतीपथावर आहेच मागणी होती. ती हा मार्ग रस्ता विकास आराखड्यामध्ये समावेश करून रस्ता राज्य मार्गात समावेशीत होऊन दर्जोन्नत होण्याची ज्यामुळे परिसरातील पन्नास गावांना यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या बाजारपेठा उपलब्ध होतील व परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होईल.

या रस्त्याच्या दर्जा नदीबाबत आमदार भीमराव केराम यांनी दूरदृष्टीने विचार करून प्रारंभापासूनच इतर जिल्हा मार्गाचे राज्य मार्गात समावेश होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासनाकडे सलग पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित आज राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या अवर सचिव (नियोजन) प्रशांत पाटील यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय निर्गमित करुन राष्ट्रीय महामार्ग १६१ आष्टा (माहूर) पासुन यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३६१ पर्यंत रस्त्याचे दर्जोन्नत राज्यमार्ग क्रमांक ४०४ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या गावांना सुविधा मिळणार?

दर्जोन्नत राज्यमार्ग मुळे माहूर तालुक्यातील लखमापूर, नखेगाव, पापलवाडी, टाकळी, लांजी, उमरा, मुरली, असोली, मेट, वाई बाजार, गोकुळ, पडसा, वडसा, सायफळ व पार्डी तर यवतमाळ जिल्ह्यातील सावळी, कवठा, शारी, मालेगाव, ईचोरा, दहेली, सेलू, सेंदुरसनी,अंजनखेड व दातोळी आदी गावांना हा रस्ता हिताचा ठरेल. शिवाय या गावातील लोकांना दळणवळणासाठी, मुख्य बाजारपेठांना जोडणारा, शेतीमाल वाहतुक,आरोग्य वैद्यकीय सुविधासाठी व इतर आवश्यक वाहतुकीसाठी सध्याच्या स्थितीमध्ये थेट रस्ता नसल्याने या मार्गाचा उपयोग सर्वच बाबतीत महत्वाचा ठरणारा असून या मार्गामुळे विदर्भ - मराठवाडा जोडला जाईल शिवाय हा रस्ता वीस किलोमीटर परिसरातील पैनगंगा नदी ओलांडून दोन्ही प्रदेशांना जोडणारा एकमेव रस्ता ठरेल.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT