टॅंकर.jpg 
नांदेड

तेवीस हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा......कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात टंचाइची तिव्रता वाढली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरवात झाली होती. मागील महिन्यात सात टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता. यात आता भर पडून सात गावे व १७ वाड्यांवर वीस टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच १३० गावात टॅंकरसाठी व टॅंकर व्यतिरीक्त  १४२ ठिकाणी अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाइ कक्षातून देण्यात आली.

मागच्या आठवड्यात होते सात टॅंकर 
जिल्ह्यात मे महिन्यात नांदेड तालुक्यातील एक व किनवट तालुक्यातील एक अशा दोन गावासह मुखेड तालुक्यातील पाच वाड्यांवर एकूण सहा हजार ८२६ नागरिकांना सात शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासोबतच ५७ गावातील ६८ ठिकाणी खासगी कुपनलिका तसेच विहिरींचे अधिगृहण करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रोहिण्या नक्षत्रात पावसाचे आगमण झाले नसल्याने टंचाइत वाढ झाली.

वीस टॅंकरने पाणी पुरवठा सुरु
सध्या नांदेड व कंधार तालुक्यातील प्रत्येकी एक, किनवटमधील तीन व माहूरमधील दोन अशा एकूण सात गावात तर कंधारमधील चार, मुखेडमधील १३ अशा एकूण १७ वाड्यावर टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात आठ टॅंकर शासकीय तर १२ खासगी टॅंकरचा समावेश आहे. यासोबतच १३० गावात टॅंकरसाठी १२ व टॅंकर व्यतिरीक्त ११९ अशा एकूण १४२ ठिकाणी खासगी विहीर व कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

२३ हजार नागरिकांना पाणी पुरवठा
जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. मागीलवर्षी पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षीक सरासरीच्या १०६ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे जलस्त्रोत भरले होते. तसेच भूगर्भातील जलसंचय वाढल्याने टंचाईची दाहकता यावर्षी अद्याप जाणवली नाही. परंतु, मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून टंचाई जाणवु लागल्याने टॅंकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. यात जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील दोन, कंधार तालुक्यात चार, मुखेडमध्ये नऊ, किनवट तालुक्यात तीन व माहूर तालुक्यात दोन अशा २० गावात टॅंकर सुरु झाले आहे. जिल्ह्यात एकूण २३ हजार ३३३ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षातून देण्यात आली.

मागीलवर्षी सुरु होते १६१ टॅंकर
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नांदेड, देगलूर, नायगाव या तालुक्यांसह नांदेड, अर्धापूर व लोहा शहरात टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. यात टंचाइच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर ३४ कोटींचा खर्च झाला होता. यात ग्रामीण व नागरी भागात एकूण १६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या अधिक म्हणजेच १०६ टक्यांनुसार एक हजार १३ मिलीमीटर झाल्यामुळे यंदा टंचाई कमी जाणवत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT