वाळू वाहतुक करणारे हेच ते ट्र्क्रर्स 
नांदेड

वाळू- बाळूंची पंचायत: तहसीलदारांची "दुचाकी"वरुन सवारी; पेनूरमध्ये ट्रॅक्टर्स जप्त

लोहा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून पेनूर, भारसावडा, चित्रावाडी, अंतेश्वर, येळी, हातणी, कौडगाव, शेवडी, कपिलेश्वर, बेटसांगवी ठिकाणांहून गोदावरी नदी पात्रात पाणी असतानाही वाळू माफिया बिहारी मजूर लावून तराफे व टोकऱ्याच्या साहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा करीत आहेत.

प्रल्हाद कांबळे

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा तालुक्यात पेनूर येथे वाळू माफियांनी (Sand smugling) उच्छाद मांडला आहे. पोलिसांच्या हप्तेगिरी (Police and administration) व महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध त्यामुळे याभागात वाळूचा बेसुमार उपसा गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. तहसीलदार परळीकर (Tehsildar Parlikar) यांनी भल्या सकाळीच " दुचाकी"वरुन गोदाकाठी गेले. तेथे अवैध वाळू वाहून नेणाऱ्या नऊ ट्रॅक्टर्सवर धाड टाकली व ते जप्त केले. शनिवारी नऊ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. पेनूरच्या स्वयं घोषित कार्यकर्त्यांला या धाडीमुळे मोठी चपराक बसली. (Tehsildar- riding- on- "two-wheeler"- tractors- seized -in Penur)

लोहा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून पेनूर, भारसावडा, चित्रावाडी, अंतेश्वर, येळी, हातणी, कौडगाव, शेवडी, कपिलेश्वर, बेटसांगवी ठिकाणांहून गोदावरी नदी पात्रात पाणी असतानाही वाळू माफिया बिहारी मजूर लावून तराफे व टोकऱ्याच्या साहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा करीत आहेत. सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो पण ठरलेल्या हप्त्यामुळे ही वाळू वाहतूक सर्रास सुरु असते.

हेही वाचा - हूनगुंदा रेती घाटातून बेसुमार उत्खनन; महसूल प्रशासनाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष, आता जिल्हाधिकारी घालणार लक्ष

हायवा ( टिप्पर) द्वारे वाहतूक करुन जादा दराने लातूर, जळकोट, उदगीरसह तालुक्यात अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जाते. बिहारी मजूर लावून तराफे व टोकऱ्याच्या सहायाने टॅक्टरद्वारे काढलेली रेती जमा करून जेसीबीच्या सहायाने हायवा व टिप्परद्वारे वाहतूक होत आहे. पेनूरभागात वाळू- बाळू ने धुमाकूळ घातला आहे.

तहसीलदार परळीकर यांनी रविवारी भल्या सकाळी "दुचाकी'वरून पेनूर भागात गेले. त्यांच्या सोबत नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी श्री. जाधव, तलाठी श्री. इंगळे, श्री. कांबळे, श्री. बोडावार यांच्या पथकाने गोदा काठावरील वाळू उपसा करणारे नऊ ट्रॅक्टरवर त्यांनी धाड टाकली व ते जप्त केले. दुचाकीवर जाऊन तहसीलदार यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत

दुसरीकडे उपविभागीय अधिकारी कंधार व या भागातील तलाठी, मंडळअधिकारी हे गोदाकाठी गेल्यानंतर पात्रातील तरफे जाळतात. ट्रॅक्टर, हायवावर कारवाई का करीत नाहीत अशी अर्थपूर्ण चर्चा सुरु आहे.

पेनूर येथील धाडीमुळे हप्तेखोरीला चपराक मानली जाते. अवैध रेती वाहतुकीविरुद्धच्या कारवाईमुळे अनेकांनी पळ काढला. तहसीलदार यांच्या कारवाईमुळे शिवाजी चौकात लोहा येथे 'जागते रहो "..म्हणून पहारा देणाऱ्या वाळू माफियांत खळबळ उडाली आहे. दुटका ( ता. पालम) येथे अधिकृत वाळू धक्का सुटला आहे. पण चोरीच्या वाळू उपशामुळे लाखो रुपये महसूल भरणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. रेतीचे नऊ ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT