fail photo  
नांदेड

शाळा सुरू करण्याची चाचपणी - कुठे ते वाचा 

नवनाथ येवले

नांदेड : लॉकडाउनचे सगळे टप्पे उद्या संपत आहेत. त्यामुळे आता सगळ्याच स्तरावर नियम शिथिल झाले आहे, पण शाळा सुरू करायची कशी? या अवघड महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या मागावर असलेल्या शिक्षण विभागाचे तळ्यात- मळ्यात सुरू आहे. जून (ता.१५) पासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्यातरी यंदा वेळेत शाळा सुरू होतील, याची शंका आहे. 

सध्यातरी ऑनलाइन शाळा सुरू करणे हा पर्याय पुढे आला असला तरी, ग्रामीण भागात सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामान्यवर्गाच्या पालकांकडे अद्याप ॲन्डरॉईड मोबाईलच नाही. त्यामुळे ऑनलाइन शाळांचे कोडे उलगडण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. 

खासगी शाळा वगळल्या तर ग्रामीण भागात आजही बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. विद्यार्थी, पालकांकडे घरी इंटरनेट असेलच असे नाही. त्यातही इंटरनेट स्पीड, डेटा अशा अनेक तांत्रिक बाबी आहेत. याशिवाय शालेय शिक्षण विभागाकडे डिजीटल अभ्यासक्रम उपलब्ध नाही. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव अशा अवस्थेत ऑनलाइन शाळा सुरु करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. 


 ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय जाहीर करण्यापूर्वी शिक्षण विभागाने कसलीच तयारी केलेली नाही. व्यवस्थापन समित्या, शिक्षक, पालक, संस्थाचालकांना विश्वासात घेतले नाही. डिजीटल शिक्षणासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध नाही. त्याची पूर्वतयारी शिक्षण विभागाने काय केली? हे प्रश्न अधांतरीच आहेत. ऑनलाइन शाळेसाठी किमान शाळास्तरावर नियंत्रणकक्षाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी विज जोडणीपासून संगणकापर्यंत अशा तांत्रिक बाबींचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरुन ठोस निर्णय प्राप्त नसले तरी जिल्ह्यात मात्र चाचपणी सुरू आहे. शाळातील भौतिक सुविधांची तपासणी यातून समोर येणाऱ्या उणिवांवर पर्याय शोधण्यात येत आहेत. शाळास्तरावर मोजक्या पालकांशी चर्चेद्वारे शाळा, शिक्षक व विद्यार्थी यापैकी कोणाचीच ऑनलाइन शाळेसाठी तयारी नसल्याचे समोर येत आहे. 

जागतिक महामारीच्या आरोग्य संकटापुढे शिक्षण थांबवता येणार नाही, ते आपल्या जीवनाचा किंबहुना विद्यार्थी जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कितीही गंभीर असले तरी त्यातुन मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागासह यंत्रणा कामाला लागली आहे. 

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ऑनलाइन शाळा हा पर्याय समोर ठेवून जिल्ह्यातील शाळांचा भौतिक आढावा घेण्यात येत आहे. शासनस्तरावरुन ऑनलाइन शाळा सुरू करण्याबाबत अद्याप आदेश नाहीत. 
प्रशांत दिग्रसकर : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT