Nanded Photo 
नांदेड

मोंढ्यात वर्दळ वाढली, पण कुणाची? 

शिवचरण वावळे

नांदेड : लॉकडाउन सुरु असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. दळण वळणाची सुविधा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण माल मोंढ्यापर्यंत येवू शकत नाही. जो माल येत आहे त्याला देखील कमी दराने विक्री करावा लागत आहे. हळदीस मागील वर्षापेक्षा सातशे ते आठशे रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.  

लॉकडाउन असला तरी, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेती औजारे, बी-बियान्यांची दुकाने, शेतीसाठी लागणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सकाळी सात ते दुपारी पाच या वेळेत मोंढा सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नवीन मोंढ्यात शेती मालाची आवक सुरु झाली असली तरी, शेतकऱ्यांची वर्दळ दिसून येत नाहीत; दिसून येते ती कामगार आणि हामाल यांची वर्दळ.
  
हेही वाचा- चिंता वाढली: हिंगोलीत पुन्हा चारजणांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली २० वर

शेतकऱ्यांची निराशा कायम

मोंढ्यात हळद, हरभरा, गहु, सोयाबिनची कमी अधिक प्रमाणात आवक सुरु आहे. जेवढी आवक होणे अपेक्षित होते त्यापेक्षा फारच कमी प्रमाणात आवक सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आजही गाव आणि शेतीमध्ये अडकुन पडला आहे. याविषयी मोंढ्यात आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेती मालास म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नैराश्य दिसून येत होते. मोंढ्यात शेतकऱ्यांपेक्षा हमाल-कामगार व महिलांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. हाताला काम मिळावे म्हणून अनेक कामगार दिवसभर दुकानांसमोर बसून असल्याचे चित्र बघायला मिळाले.

अशी आहे मोंढ्यातील मालाची आवक (क्वींटलमध्ये ) ता. २० ते २७ एप्रिल पर्यंत

- गहु - ११३ क्वींटल दर जास्तीत जास्त एक हजार ८५० रुपये, सरासरी - एक हजार ७६६ रुपये
- ज्वारी-१८ क्वींटल- किमान व सरारसी दर एक हजार ९०० रुपये इतका
- चन्ना- ९२२ व्वींटल- जास्तीत जास्त तीन हजार ८०० ते तीन हजार ६८३ रुपये 
- तूर- ५६ क्वींटल - जास्तीत जास्त पाच हजार १९३ ते पाच हजार ८६ रुपये
- सोयाबिन-एक हजार ११६ क्वींटल- जास्तीत जास्त तीन हजार ७०० रुपये ते तीन हजार ६४२ रुपये असा दर मिळत आहे

२७ ते २९ एप्रिल दरम्यानचे दर

- गहु- १२ क्विंटल ः दर जास्तीत जास्त एक हजार ७५० रुपये, सरासरी -एक हजार ७२५ रुपये
- हरभरा-५४६ क्वींटल ः जास्तीत जास्त तीन हजार ९०० व सरारसी तीन हजार ७७६ रुपये 
- तूर-९० क्वींटल - जास्तीत जास्त पाच हजार १२५ ते चार हजार ७०० रुपये
- सोयाबीन-एक हजार ३६० क्वींटलः जास्तीत जास्त तीन हजार ८०० रुपये ते तीन हजार ७५० रुपये असा दर मिळत आहे.
- हळद- तीन हजार ९५२ जास्तीत जास्त सहा हजार २४० कमीत कमी पाच हजार ४०० रुपये

दळणवळण सुरु झाल्यास दर वाढ शक्य
मागील वर्षापेक्षा यंदा लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा पूर्ण माल मोंढ्यात आलेला नाही. शिवाय हळदीला मागील वर्षापेक्षा किमान आठशे रुपयाने दर कमी मिळत आहे. लॉकडाउन परिस्थिती अशीच राहिल्यास दरवाढ होणार नाही. परीणामी शेतकऱ्यांना कमी दराने मालाची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे.
डी. ए. संगेकर (सचिव बाजार समिती नांदेड) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT