NND19KJP01.jpg 
नांदेड

.....अबब दोन लाख वीस हजार आले ऑनलाइन अर्ज

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : आगामी हंगामासाठी खरीप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळावे, यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन कर्ज मागणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ता. १७ मे पासुन आजपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांनी पिककर्जासाठी अर्ज केले आहेत. अर्जासाठी शनिवार (ता. सहा) शेवटची तारीख असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस यांनी दिली.  

संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. बँकांतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी २०२० - २१ या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर (ता. १७ मे ते सहा जून) दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन कर्ज मागणी करण्याचे आवाहन केले होते. 

सव्वा दोन लाख ऑनलाइन अर्ज 
पहिल्या टप्यात ता. १७ ते २७ मे या दहा दिवसांत जिल्ह्यातील एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली. ता. २७ मे नंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ऑनलाइन अर्जासाठी ता. सहा जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ता. चार जूनपर्यंत जिल्ह्यात दोन लाख २० हजार शेतकऱ्यांनी पिककर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. अर्जासाठी शनिवारी (ता. सहा) अंतिम तारीख असल्यामुळे अधिकाधीक शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कर्ज देण्यापासून टाळता येणार नाही
ऑनलाइन अर्जामुळे बॅंकांना पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून टाळता येणार नाही. पूर्वी बॅंकांकडून शेतकऱ्यांनी आमच्याकडे कर्ज मागणी केली नाही, अशी माहिती दिली जात होती. परंतु, यावेळी शेतकऱ्यांना कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बॅंकांना पात्र खातेदारांना कर्ज वितरित करावे लागेल. ऑनलाइन केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडे कर्ज वितरणासाठी पाठविण्यात येणार आहे. यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीककर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. यापुढेही शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Latest Marathi News Live Update : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे मुंबईत पडसाद; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

अमृता खानविलकरची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा बिझनेस; कसला व्यवसाय सुरू केला माहितीये?

Maharashtra Education Scam: यवतमाळमधील शिक्षक घोटाळा उघडकीस; ३९ बनावट शालार्थ आयडी; शिक्षणाधिकारी अटक!

SCROLL FOR NEXT